नागपूर/भंडारा – नाभिक एकता मंच, नागपूर च्या वतीने संत सेना महाराज सांस्कृतीक व कला मंडळ द्वारा संचालित मानव कल्याण वृद्धाश्रम ला सदिच्छा भेट देण्यात आली. जेष्ट समाजसेवक व नाभिक समाजातील प्रतिष्टीत नागरिक ह.भ.प. श्री. गुलाबरावजी लांजेवर महाराज यांच्या वतीने या वृद्धाश्रमाची देखभाल व सांभाळ करण्यात येते. लांजेवर महाराज वृद्ध आणि थकलेल्या व्यक्तीची निःस्वार्थ आणि निष्काम भक्तीने सेवा देत आहेत. यावेळी स्थानिक कुठल्याही संघटना, संस्था किव्हा पुढऱ्यांकडून या आश्रमाला कुठलीही मदत मिळत नसल्याचे निदर्शनास आले.

तिथे 6 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश असून एकमेव गुलाबराव महाराज त्या वृद्धाश्रमात कार्य करीत आहे. तेथे त्यांच्या राहण्याची आणि पोटापाण्याची सुद्धा सुविधा पुरेशी नसल्याचे दिसून आले तसेच त्यांना दैनंदिन जीवनात वापरण्याकरिता संडास/बाथरूम ची सुद्धा सुविधा नसल्याचे निदर्शनाड आले. यावेळी नाभिक एकता मंच च्या टीम ने त्यांच्या सोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली व तसेच सर्व आश्रम ची पाहणी केली.

मानव कल्याण वृद्धाश्रम ला नाभिक एकता मंच शी संलग्न करण्याची महाराजांना विनंती करण्यात आली आणि सर्व टीम ने नाभिक समाजामार्फत यथायोग्य सहयोग करण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी नाभिक एकता मंच च्या वतीने जीवनावश्यक वस्तु भेट देण्यात आल्या व समाजाच्या वतीने पुढाकार घेऊन तेथील संडास/बाथरूम चे काम लवकरच सुरु करण्याचे आस्वासन दिले.
नाभिक एकता मंच च्या वतीने सर्व पदाधिकारी मंडळ व समाजातील इतर संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात आले की, या मानवी कल्याण कार्यक्रमात एकजूट होऊन सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा व सहकार्य करावे.

यावेळी नाभिक एकता मंचचे संस्थापक धनराज वलुकार, मार्गदर्शक नानाभाऊ कुकटकर, विदर्भ उपाध्यक्ष राजेश मानकर, नागपूर जिल्हा अध्यक्ष विलाश वाटकर, भंडारा जिल्हा अध्यक्ष रवी लांजेवार, गजानन कुकटकर, गणेश उमरकर, विकास लाखे, विक्की साबळे, लक्ष्मन सराटे, निलेश अतकर, राजेंद्र चौधरी, निलकंठ वाटेकर, अरवींद वाटकर, ओम दवलेकर, एकनाथ खैरकर, कुणाल मोरस्कर, भूषण खातखेडे, शंकर वलुकार तसेच भंडारा जिल्ह्यातील नाभिक एकता मंच चे पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
मुख्य संपादक सा. रयत रक्षक, महाराष्ट्र. रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र.






