महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न; स्वातंत्र्य दिन व कै. बाबारावजी बुंदेले स्मृतिदिनानिमित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

SHARE:

अमरावती – “भारताचा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशातील विविधतेत एकता दर्शवितो. जात, धर्म आणि पंथ विसरून एकत्र येण्याची प्रेरणा देतो. मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देतो. हा राष्ट्रीय सण तरुणांमध्ये देशभक्तीची, शिस्तीची आणि देशसेवेची भावना जागृत करतो.” असे विचार प्रा. अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

ते महात्मा फुले शिक्षण समिती संचलित महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुधोळकर पेठ, अमरावती येथे दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न झालेल्या “स्वातंत्र्य दिनाच्या” कार्यक्रमात प्रमुख अतिथी पदावरून विचार व्यक्त करीत होते.

 

 

स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंदाकिनी वसंतराव निमकर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मा. श्रीमती मंदाकिनी निमकर, प्रमुख अतिथी संस्था सचिव रमेश बा. पवार, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मनोज भा. भेले, सहसचिव प्रा. किशोर ह. श्रीखंडे, प्रा. डॉ. जयंत पवार, संस्थेचे मान्यवर सदस्य व आधारस्तंभ श्री महेश व. निमकर, प्राचार्या कु. वृषाली विजयराव टाकरखेडे, अभंगकार व साहित्यिक प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले, अशोकराव होले, प्रा. संजय सु. शेंडे, प्रा. श्रीकृष्ण बनसोड होते.

“स्वातंत्र्य दिन तरुणांमध्ये देशभक्ती
जागृत करणारा दिवस” – प्रा. अरुण बुंदेले

प्रा. अरुण बुंदेले यांनी ‘स्वातंत्र्य दिन’ या स्वरचित क्रांतीगीताचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी देशभक्तीपर गीतांचे गायन सिद्धी सरदार, माधवी सरदार, वंशिका खंडारे, गुंजन कोठार यांनी केले. विद्यार्थिनींनी देशभक्ती गीतांवर नृत्य सादर केले.

याप्रसंगी कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांनी त्यांचे वडील माजी नगरसेवक कै. बाबारावजी बुंदेले यांच्या १५ ऑगस्ट २०२६ ला असलेल्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त वर्ग दहावीमध्ये शाळेतून पहिला क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कु. इशिका निकेश चौहान ला कै. मैनाबाई बुंदेले स्मृती पारितोषिक तसेच वर्ग बारावी HSCVC शाखेतून प्रथम आलेल्या कु. विद्या विद्यानंद वानखडे ला कै. बाबारावजी बुंदेले स्मृती पारितोषिक रोख रक्कम, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, प्रा. बुंदेले लिखित “आदर्श अभ्यासाचे तंत्र” व “आदर्श नारी शक्ती” ही पुस्तकं देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचलन गजानन पोटदुखे तर आभार मंगेश गोरडे यांनी मानले. कार्यक्रमाला जयश्री दि. राऊत, अमोल इंगळे, अनिल मावस्कर, पूजा सिंह तथा शिक्षकेतर कर्मचारी राजेश ढेवले, राम किसन चव्हाण, रजत खडसे बहुसंख्य विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment