आदिशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे साहित्यिक व सामाजिक पुरस्कार जाहीर; संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अमरावती येथे आयोजन..

SHARE:

अमरावती आदिशक्ती बहु. संस्थेचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन येत्या रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, अमरावती येथे सकाळी 10 वाजता संपन्न होत आहे. या संमेलनास राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, डॉ. राम खिलावण पटेल माजीमंत्री मध्यप्रदेश, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील (कोल्हापूर), प्राचार्य डॉ. स्मिता पाटील स्वागताध्यक्ष(अमरावती), सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सतीश तराळ उद्घाटक (अमरावती), सुप्रसिध्द लेखक डॉ. अशोक पाटील (इस्लामपूर), सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. विलास आंबेकर (शिरूर,अहमदनगर), युवा उद्योजक श्री. प्रमोद ठोंबे पाटील(पुणे), राष्ट्रीय समाज भूषण किसन परशराम बोंद्रे (ठाणे), प्रा.डॉ.सौ. स्मिता दिनेश सूर्यवंशी (नगरसेविका, अमरावती) या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनपुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे.

  राज्यभरातून आलेल्या विविध साहित्य कृतीतून आदिशक्ती बहुदेशीय संस्थेचा महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे “राज्यस्तरीय आदिशक्ती महाराष्ट्र साहित्य कोहिनूर पुरस्कार 2026” पुणे येथील  सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. विठ्ठल पांडुरंग पाटील यांच्या “मायनस शून्य” या साहित्य कृतीस प्राप्त झाला आहे.

कविवर्य सुरेश भट गझल पुरस्कार 2026 साठी सौ. पुष्पाताई दलाल (धामणगाव रेल्वे) यांच्या “पापणकळा”  या गझलसंग्रहास प्राप्त झाला आहे.

सुप्रसिध्द वऱ्हाडकवी डॉ. अहमद मिर्झा बेग काव्य पुरस्कार 2026 साठी (तिरोडा भंडारा) येथील कवी प्राचार्य हरिभाऊ देशमुख यांच्या  “निखळले मणी” या काव्य संग्रहास प्राप्त झाला आहे.

कवी कुसुमाग्रज अनुवाद पुरस्कार 2026 साठी अमरावती येथील प्रा. डॉ. शर्मिला प्रभुणे यांच्या “कबिराच्या कविता” या काव्यसंग्रहाची निवड झालेली आहे.

समाजसेवक राजाभाऊ गायकवाड उत्तम कथासंग्रह पुरस्कार 2026 साठी

– श्री. सुनील मंगेश जाधव (उमरोळी,पालघर) यांच्या “मर्म” या कथासंग्रहास,

– समाजभूषण उत्तमराव दासू तरकसे (खारघर, नवी मुंबई) यांच्याकरपली भाकरया कथासंग्रहास,

– सौ. रेखा सतीशराव देशमुख (पोटे टाउनशिप, अमरावती) यांच्या “फिटेअंधाराचे जाळे” या कथासंग्रहास

सौ रंजना कराळे (धर्माळे) (दर्यापूर) यांच्याझिलीया कथासंग्रहास,

– डॉ. नारायण अंधारे (अकोला) यांच्या “दोन हात दहा बोटे” या कथासंग्रहास,

– डॉ. अस्मिता खांबरे (अमरावती) यांच्या “वात्सल्यमूर्ती”  या कथासंग्रहास प्राप्त झाला आहे.

उद्धव शेळके कादंबरी पुरस्कार 2026,

– डॉ. रमेश जलतारे (पुणे) यांच्या “अंतहीन आकाश” या कादंबरीस,

– सौ. शोभना देशमुख (अमरावती) यांच्या कादंबरीस प्राप्त झाला आहे.

आदर्श शिक्षिका सुशीलाबाई टेकाडे बालसाहित्य पुरस्कार 2026 सौ. सीमा भांदर्गे (अमरावती) यांच्या “धारा वाचवा” या बालकविता संग्रहास प्राप्त झाला आहे.

श्रीमती सरलाताई  शेंडे (अकोला) यांना “नारीशक्ती पुरस्कार 2026” प्राप्त झाला आहे.

सौ. राधिका रूपेश घाटगे (शिरूर,अहमदनगर) यांना “आयर्न लेडी ऑफ द इयर २०२६” हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

श्री. प्रमोद ठोंबे पाटील (पुणे) यांना “प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज राज्यस्तरीय आध्यात्मिक सेवा पुरस्कार 2026” प्राप्त झाला आहे.

श्री. किसन परशराम बोंद्रे राष्ट्रीय समाज भूषण समाज सेवक यांना “ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2026″ प्राप्त झाला आहे.

या साहित्य संमेलनात पुरस्कार, सत्कार ,परिसंवाद, कवि संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी दिवसभर असणार आहे. सदर साहित्य संमेलनास रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे, असे  आवाहन आदिशक्ती बहु. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. शोभा गायकवाड यांनी केले आहे.

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment