शिक्षक सन्मानार्थ ऑनलाइन कविसंमेलन उत्साहात संपन्न…

SHARE:

अमरावती : शिक्षक दिनाचे औचित्य साधून बांधिलकी प्रतिष्ठान तसेच आदिसंपदा यांच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक७/९/२६ रोज सोमवार ला “आपल्या शिक्षकांवर बोलू काही” या विषयावर शिक्षक सन्मानार्थ विशेष ऑनलाइन कविसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या विविधांगी कवितांनी या कविसंमेलनाला भावपूर्ण रंगत आणली.

कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. डॉ. सतीश तराळ होते. संमेलने ही ऑनलाईन व्हावीत जेणेकरून जगभरातून एका ऑनलाईन व्यासपिठावर साहित्यिक एकत्र येऊ शकतील. असे अध्यक्षिय भाषणातून विचार मांडून मा.तराळ सरांनी आयोजकांचे अभिनंदन केले. उद्घाटक म्हणून मा. प्रा. प्रतिभाताई सराफ यांनी साहित्य तसेच शिक्षकांच्या भूमिकेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले , तर स्वागताध्यक्ष म्हणून मा. डॉ. शोभाताई गायंकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत तसेच अमूल्य विचार व्यक्त केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. ॲड. स्मिता बुल, प्रा. प्रतिभा पिटके, मा. प्रभाताई आवारे, , मा. प्रा. पुष्पा तायडे आणि मा. प्रा. जयश्री कोटगीरवार यांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. ॲड. नीता कचवे यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी मा. डॉ. मंदा नांदूरकर यांनी समर्थपणे सांभाळली, तर आभार मा. प्रफुल्ल ठाकरे यांनी मानले.

कविसंमेलनात मा. शालिनी कावरे, मा. स्वाती प्रकाश टोपले, मा. वृषाली वानखडे, मा. त शिवांगी वेरुळकर, मा. सुलोचना लडवे, मा. शुभांगी उपळकर, मा. रिया तायडे, मा. माधुरी बाजारे, मा. डॉ. राणी चौधरी, मा. श्रद्धा कोल्हटकर, मा. ज्योती माथने, मा. सुनीता तायडे, मा. शोभना देशमुख, मा. शारदा बरडे, मा. मीना सुरेश पाटणे, मा. ममता मस्की, मा. पद्मा याऊळ आणि मा. स्मिता भोस्कर चिद्रावार (अमेरिका) यांनी सहभाग नोंदविला.

सहभागी कवींनी आपल्या शिक्षकांच्या आठवणी, संस्कार, मार्गदर्शन आणि जीवनाला दिलेल्या दिशा यांना कवितेतून उजाळा दिला. गुरु-शिष्य नात्याचा स्नेह, शिक्षकांविषयीची कृतज्ञता आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करणाऱ्या भावस्पर्शी कवितांनी ऑनलाइन व्यासपीठ भारावून गेले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, सहभागी कवी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे कविसंमेलन अत्यंत सुंदर, भावपूर्ण आणि संस्मरणीय ठरले, अशी भावना आयोजक बांधिलकी व आदिसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

ॲड. नीता प्रफुल कचवे
Author: ॲड. नीता प्रफुल कचवे

लेखिका माजी जिल्हा परिषद शिक्षिका (स्वेच्छा निवृत्त) असून एक उत्कृष्ट साहित्यिक अधिवक्ता, समुपदेशक व वक्ता म्हणून कार्यरत आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान व बांधिलकी बहुउद्देशीय ट्रस्ट अमरावती च्या संस्थापक अध्यक्षा म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. समाजात वाचनालय, बालसंस्कार केंद्र, महिला व युवतींसाठी विविध उपक्रमे, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा, शाळा व कॉलेज मधे विविध विषयांवर व्याख्यान हे त्यांचे प्रमुख कार्य आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठी साहित्य मंडळ, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल भारतीय कुर्मी मराठा समाज संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी ३० पुस्तकांचे प्रस्तावना लेखन केलेले आहे. तीन पुस्तकांचे संपादन केलेले आहे. कथा, कविता व लेखन सारख्या विषयांवर कार्यशाळा घेणे, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे. त्यांनी स्वतः १० पुस्तकांचे प्रकाशन केले असून ५ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार २०२५, राष्ट्रीय नारिशक्ती पुरस्कार २०२६ दिल्ली, शब्दवेल नारिशक्ती सन्मान २०२६, खरी कारभारीण नारिशक्ती पुरस्कार २०२६, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले काव्यप्रतिभा पुरस्कार २०२६ च्या त्या मानकरी ठरल्या आहेत. समाज जागृती हा त्यांचा आवडीचा छंद राहिला असून, सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात.

Leave a Comment