समाजप्रबोधनकर्ते, आदर्श शिक्षक, सा. रयत रक्षक आणि रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र चे लेखक, साहित्यिक व अभंगकार प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांच्या सहधर्मचारिणी “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार” प्राप्त सौ. ज्योती अरुण बुंदेले (पद्मने) यांचा दि. ७ सप्टेंबर २०२६ ला ५८ वा वाढदिवस त्यानिमित्त त्यांनी आपल्या भार्येवर शब्दबद्ध केलेली ही रचना.
सहधर्मचारिणी सौ. ज्योतीच्या वाढदिवसाचा
“क्षण आनंदाचा”
संसाराची वेल तू सजवलीस ।
आनंदाने घरपण जपलेस ॥
ज्योती तुझ्यामुळे पूर्ण हा संसार ।
मुलांना घडविणे जीवनाचे सार ॥
विद्यार्थ्यांचे भविष्य तू घडविले ॥
मायेने कधी शिस्तीने ज्ञान दिले ॥
अनेक पिढ्यांवर केले संस्कार ।
विद्यार्थ्यांना तूच दिला आधार ॥
तू शिक्षिका असण्याचा अभिमान ।
बुंदेले घराण्याचा केला सन्मान ॥
घर आणि शाळा दोन्ही सांभाळल्या ।
आयुष्यात सुखाच्या कळ्या फुलल्या ॥
अशीच हसत राहा, निरोगी राहा ।
जीवनात बरसो आनंदाच्या धारा ॥
लाभो तुझीच साथ नेहमी मला ॥
तुझ्या वाढदिवशी जीव आनंदला ॥
५८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ॥
आनंदी जीवनाच्या मनस्वी सदिच्छा ॥
तुझाच भ्रतार –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
(सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज च्या संपूर्ण परिवाराच्या वतीने सौं. ज्योती अरुण बुंदेले यांना वाढदिवसाच्या हार्दिक…)
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सामाजिक क्षेत्रातील असंख्य अश्या पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.





