अमरावती : सामाजिक, सांस्कृति, साहित्यिक आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या बांधिलकी प्रतिष्ठान अमरावतीच्या कार्याचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अमरावती जिल्हा, अमरावती शहर, अमरावती तालुका, अचलपूर तालुका तसेच जळगाव जिल्ह्यात विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
या नियुक्त्यांमध्ये अमरावती जिल्हाध्यक्षपदी डॉ. सिम्रेला देशमुख, उपाध्यक्षपदी सुनिता तायडे, सचिवपदी वृषाली वानखडे, कोषाध्यक्षपदी जयश्री कोटगीरवार आणि सहसचिवपदी योगिता निपाणे यांची निवड करण्यात आली. अमरावती तालुकाध्यक्षपदी जयश्री बोडखे व उपाध्यक्षपदी वृषाली कडू, तर अचलपूर तालुकाध्यक्षपदी शारदा गणोरकर यांची नियुक्ती करण्यात आली.
जळगाव जिल्हाध्यक्षपदी बापूराव ठाकरे पाटील यांची निवड करण्यात आली.
अमरावती शहराध्यक्षपदी छाया राऊत बर्वे, उपाध्यक्षपदी संजीवनी काळे, कोषाध्यक्षपदी ॲड. स्मिता बुल, सचिवपदी प्रभाताई आवारे, सहसचिवपदी डॉ. कैलास कापडे तसेच महिला आघाडी प्रमुखपदी पुष्पा अतकरे आणि रेखा देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक व समुपदेशनविषयक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. समाजातील वंचित घटकांना आधार देणे, स्त्रीशक्तीचा सन्मान, बालसंस्कार, साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे या उद्दिष्टांना नव्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून निश्चितच बळ मिळेल.
‘तिमिरातुनी तेजाकडे’ हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करणाऱ्या बांधिलकी प्रतिष्ठानच्या या विस्तारामुळे संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा आणि नवी दिशा मिळणार आहे.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे बांधिलकी प्रतिष्ठान परिवाराच्या वतीने तसेच बांधिलकी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष ॲड नीता प्रफुल्ल कचवे यांचेकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान तर्फे सुद्धा सर्व निवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Author: ॲड. नीता प्रफुल कचवे
लेखिका माजी जिल्हा परिषद शिक्षिका (स्वेच्छा निवृत्त) असून एक उत्कृष्ट साहित्यिक अधिवक्ता, समुपदेशक व वक्ता म्हणून कार्यरत आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान व बांधिलकी बहुउद्देशीय ट्रस्ट अमरावती च्या संस्थापक अध्यक्षा म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. समाजात वाचनालय, बालसंस्कार केंद्र, महिला व युवतींसाठी विविध उपक्रमे, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा, शाळा व कॉलेज मधे विविध विषयांवर व्याख्यान हे त्यांचे प्रमुख कार्य आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठी साहित्य मंडळ, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल भारतीय कुर्मी मराठा समाज संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी ३० पुस्तकांचे प्रस्तावना लेखन केलेले आहे. तीन पुस्तकांचे संपादन केलेले आहे. कथा, कविता व लेखन सारख्या विषयांवर कार्यशाळा घेणे, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे. त्यांनी स्वतः १० पुस्तकांचे प्रकाशन केले असून ५ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार २०२५, राष्ट्रीय नारिशक्ती पुरस्कार २०२६ दिल्ली, शब्दवेल नारिशक्ती सन्मान २०२६, खरी कारभारीण नारिशक्ती पुरस्कार २०२६, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले काव्यप्रतिभा पुरस्कार २०२६ च्या त्या मानकरी ठरल्या आहेत. समाज जागृती हा त्यांचा आवडीचा छंद राहिला असून, सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात.





