उरली केवळ आठवण!

SHARE:

‘बैलपोळा‘ निमित्य प्रसिद्ध साहित्यिक ॲड. नीता प्रफुल्ल कचवे यांची कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करत आहोत..

बैलपोळा

 

कुठे गेले ते बैल आता,
कुठे घुंगरांचा नाद?
ट्रॅक्टरच्या त्या धुरामागे,
हरवला मातीशी संवाद!

पोळ्याला बैल कुठे उरले?
राहिली केवळ रीत,
शिंगांना रंगवायची जागा,
उरली फोटोतील प्रीत.

नांगर ओढणारे खांदे,
आज दिसती कुठे?
यंत्रांच्या लोखंडी पोटात,
मातीची हाकच गुदमरते

शर्यतीपुरते उरले बैल,
बाकी सारा इतिहास;
माणूस पुढे गेला म्हणतो,
पण हरवला एक श्वास!

 

लेखिका –
ॲड. नीता प्रफुल्ल कचवे
साहित्यिक तथा समुपदेशक
संस्थापक : बांधिलकी प्रतिष्ठान तथा बांधिलकी बहुउद्देशिय ट्रस्ट, अमरावती.
संपर्क – ८८०५२५८०१६

ॲड. नीता प्रफुल कचवे
Author: ॲड. नीता प्रफुल कचवे

लेखिका माजी जिल्हा परिषद शिक्षिका (स्वेच्छा निवृत्त) असून एक उत्कृष्ट साहित्यिक अधिवक्ता, समुपदेशक व वक्ता म्हणून कार्यरत आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान व बांधिलकी बहुउद्देशीय ट्रस्ट अमरावती च्या संस्थापक अध्यक्षा म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. समाजात वाचनालय, बालसंस्कार केंद्र, महिला व युवतींसाठी विविध उपक्रमे, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा, शाळा व कॉलेज मधे विविध विषयांवर व्याख्यान हे त्यांचे प्रमुख कार्य आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठी साहित्य मंडळ, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल भारतीय कुर्मी मराठा समाज संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी ३० पुस्तकांचे प्रस्तावना लेखन केलेले आहे. तीन पुस्तकांचे संपादन केलेले आहे. कथा, कविता व लेखन सारख्या विषयांवर कार्यशाळा घेणे, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे. त्यांनी स्वतः १० पुस्तकांचे प्रकाशन केले असून ५ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार २०२५, राष्ट्रीय नारिशक्ती पुरस्कार २०२६ दिल्ली, शब्दवेल नारिशक्ती सन्मान २०२६, खरी कारभारीण नारिशक्ती पुरस्कार २०२६, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले काव्यप्रतिभा पुरस्कार २०२६ च्या त्या मानकरी ठरल्या आहेत. समाज जागृती हा त्यांचा आवडीचा छंद राहिला असून, सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा