चि. आरुष ऋषिकेश बुंदेलेचा प्रथम वाढदिवस उत्साहात साजरा; कवी प्रा. अरुण बुंदेले यांच्या आरुषवरील बालगीतांनी आणली रंगत..

SHARE:

अमरावती : स्थानिक प्रोफेसर कॉलनीतील प्रतिष्ठित नागरिक सौ. आश्विनी व ऋषिकेश बुंदेले यांचा सुपुत्र आरुष तसेच सौ. संध्या व प्रा. बाळाभाऊ बुंदेले व सौ. इंदुमती सरदार व श्री. नामदेवराव सरदार (वाशिम) यांचा नातू आरुष याचा प्रथम वाढदिवस ५ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात शिवा लॉन, प्रोफेसर कॉलनी, अमरावती येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर बाळासाहेब बुंदेले, प्रमुख अतिथी श्री. शुभम बाळासाहेब वानखडे (सचिव, ग्रामीण शिक्षण संस्था, काँग्रेस नगर, अमरावती) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्नेहल शुभम वानखडे, साहित्यिक व अभंगकार प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले, मा. प्राचार्य श्रीप्रभू चापके, श्री. नामदेवराव सरदार, प्राचार्य डॉ. किरण खंडारे, प्रा. प्रज्ञा खंडारे, श्री. निरंजन इंगळे, प्रा. डॉ. प्रवीण विधळे, श्री. पुंडलिक धुमाळे, श्री. ज्ञानेश्वर बुंदेले होते.

 

      सर्वप्रथम शिघ्रकवी व अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांनी आरुषच्या प्रथम वाढदिवसानिमित्त “आरुष एक गोंडस बाळ” हे स्वरचित आरुष बाळावरील बालगीत गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

“सूर्याचे पहिले किरण म्हणजे आरुष”
                       – शुभम बाळासाहेब वानखडे

       प्रमुख अतिथी श्री. शुभम वानखडे आपल्या मनोगतातून बाळाला शुभाशीर्वाद देताना म्हणाले की, “आरुष बाळ भविष्यामध्ये तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा धनी म्हणून उदयास येईल, कारण आरुष म्हणजे सूर्याचे पहिले किरण होय. त्याला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” असे विचार व्यक्त केले.

     प्रमुख अतिथी मा. प्राचार्य श्रीप्रभू चापके व प्रा. अरुण बुंदेले यांनी बाळाला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व आरुष बाळ बुंदेले घराण्याचे नाव आपल्या कर्तुत्वाने रोशन करेल असा आशीर्वाद दिला. प्रा. बाळाभाऊ देवरावजीं बुंदेले आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गुरू रविदासजी, निष्काम कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी अण्णाजी उर्फ बाबुरावजी वानखडे यांना स्मरण करून बाळाला भविष्यासाठी आनंदी, निरोगी, समृद्ध आणि भरभराटीचे आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.

        या कार्यक्रमाचे काव्यमय सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन साहित्यिक प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांनी केले.

         या कार्यक्रमाला ऐश्वर्या बाळाभाऊ बुंदेले, श्री. रामदास श्रावणजी बुंदेले, सौ. सुमित्रा रामदास बुंदेले, श्री. राजु श्रावणजी बुंदेले, श्री. बाबुराव झ्याबुजी बुंदेले, श्री. ज्ञानेश्वर उत्तमराव बुंदेले, डॉ. मनीष बुंदेले, सौ. इंदुमती सरदार, श्री. नामदेवराव सरदार, पुनीत नामदेवरावजी सरदार, सौ. रेखा सरदार, श्री. माणिकराव सरदार, रोहन माणिकराव सरदार, आदिती माणिकराव सरदार, श्रीमती आशा भानुदास खंडारे, प्राचार्य डॉ. किरण भानुदास खंडारे, प्रा. डॉ. प्रज्ञा किरण खंडारे, डॉ. शरयु किरण खंडारे, सिद्धेश किरण खंडारे, श्री. रवींद्र भानुदास खंडारे, सौ. जयश्री रवींद्र खंडारे, आदित्य रवींद्र खंडारे, प्रतिक्षा रवींद्र खंडारे, श्री. निरंजन दौलतराव इंगळे, सौ. शोभा निरंजन इंगळे, नितीन निरंजन इंगळे, रुपाली नितीन इंगळे, सौ. योगिता किचम्बरे, सुशील प्रलंधराव धुमाळे, सौ. ममता सुशील धुमाळे, सौ. प्रीती इंगळे, प्रा. डॉ. प्रवीण विधळे सर, प्रा. सौ. रेखा विधळे मॅडम सर्व नातेवाईक ,बहुसंख्य समाज बांधव व प्रोफेसर कॉलनी मित्र मंडळ, गौरी महिला बचत गटातील सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते तसेच कार्यक्रमाची सांगता स्वरुची भोजनाने झाली.

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा