मा. भरतराव खासबागे सामाजिक बांधिलकी स्वीकारणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व – प्रा.अरुण बुंदेले; कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे सत्यशोधक समाजाच्या वर्धापनदिनी मा. भरतराव खासबागे यांचा सत्कार

SHARE:

अमरावती – “आजचे सत्कारमूर्ती मा. भरतराव खासबागे यांचा वाढदिवस महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या १५३ व्या वर्धापन दिली होत आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. भरतराव कार्यकारी अभियंता पदावर विराजमान होते पण अहंकारी नव्हते. सर्व कर्मचाऱ्यांसोबत त्यांची वर्तणूक समान होती. माळी समाज वधु-वर परिचय मेळाव्याला, समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांच्या महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाला त्यांनी भरपूर मदत केली. यवतमाळ शहरातील डॉ. आंबेडकर भवनाचे उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम निर्धारित वेळेपूर्वीच त्यांनी पूर्ण केले. शासकीय कामांना प्राधान्य देऊन गतीशील केल्यामुळे २००७ मध्ये जिल्हास्तरीय गतीमान प्रशासन पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. सन १९९३ ते १९९६ या काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील भुकंपग्रस्तांच्या मदतीकरिता अहोरात्र कार्य केले, तसेच समाजातील वंचित घटकांची ते सेवा करतात अशी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करणारे भरतराव खासबागे एक सेवाभावी व्यक्तिमत्व आहे. त्यांचे मी वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन करतो व  सत्यशोधक समाजाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान आज आचरणात आणले गेले पाहिजे.” असे विचार साहित्यिक प्रा. अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

       ते सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, स्ट्रक्चर इंजिनियर, ऋणानुबंधाचे उपाध्यक्ष मा. भरतराव खासबागे यांचा ७१ वा वाढदिवस कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे दि. २४ सप्टेंबर २०२६ ला सत्यशोधक समाजाच्या १५३ व्या वर्धापनदिनी महात्मा फुले चौक, अमरावती येथे संपन्न झालेल्या अभिष्ठचिंतनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरुण बंदेले, प्रमुख पाहुणे समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष, उपेक्षित समाज महासंघ), आय. टी. इंजिनियर व ऋणानुबंधाचे कार्यकर्ते श्री निरज खासबागे, ओबीसी नेते राजाभाऊ हाडोळे, माळी समाज ऋणानुबंधचे ओमप्रकाश अंबाडकर, मधुकर आखरे, राजकुमार खैरे, उद्योजक नंदकिशोर वाठ होते. यावेळी सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.

श्री. भरतराव खासबागे सेवाव्रत स्वीकारणारे विश्व जागृती मिशनचे अध्यक्ष – प्रा.श्रीकृष्ण बनसोड

          कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सत्यशोधक प्रा. श्रीकृष्ण बनसोड म्हणाले की, ” मा. भरतराव खासबागे विश्व जागृती मिशन या सेवाभावी संस्थेच्या महामंत्री पदावर २४ वर्षे होते. आज ते कार्यकारी अध्यक्ष आहेत. या मिशनच्या माध्यमातून त्यांचे सेवाव्रत आजही सुरू आहे तसेच अपंगांना मदत करण्याचे भरतराव खासबागे यांनी सेवाव्रत अंगीकारले आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्याला गतीशील करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. मृदुभाषी, मितभाषी, कुटूंबवत्सल व मनमिळावू स्वभाव असणाऱ्या मा. भरतराव खासबागे साहेबांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतो व सत्यशोधक समाजाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो.!” असे विचार व्यक्त केले.

       सर्व प्रमुख अतिथी तथा नाट्यकर्मी सुशीलदत्त बागडे, कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे, काँग्रेसचे अभिनंदन पेंढारी, पत्रकार राज वावरे, प्रा. सुप्रिया गजभिये, गोपाल उताणे व फुले, शाहू, आंबेडकरी अनुयायांनी भरतराव खासबागे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमाचे संचलन निरज खासबागे तर आभार मधुकर आखरे यांनी मानले.

आकाश रमेशराव दानखडे
Author: आकाश रमेशराव दानखडे

लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा