सांज वेळी रान फुला.!!

SHARE:

प्रसिद्ध साहित्यिक तथा कवी श्री. प्रफुल्ल ठाकरे यांची विशेष कविता. याचे वैशिष्ट्य असे की, ही कविता फक्त दोन अक्षरी एकशे अठ्ठावीस (१२८) शब्द वापरून निर्माण केलेली काव्यरचना सोळाक्षरी दुलारी येथे वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

सांज वेळी रान फुला.!!

कसं सांगू प्रिया तुला, तुच आता सांग मला
तुझ्या सवे संग नवा, जीव सारा सोडी जुना..

प्रित तुझी माझी अशी, दिन रात मास बारा
एक श्वास एक प्राण, सूर ताल रुद्र वीणा..

सांज वेळी रान फुला, प्रित वेडी सांगे तुला
रान वेली दाट वना, आस तुझी लाख गुना..

मेघ नभी वाट पाही, धीर सोडी मुक्त धारा
पक्षी गाती नाद बघा, गोड स्वरे मोर मैना..

जिणं कस पिसं झालं, मन मोर धुंद कसा
काय करु आता प्रिया, नाद गंध राना वना..

मागं आता जाऊ कशी, नवं जग स्वप्नी दिसे
दूर दूर गाव गेले, भिती दाटे खुळ्या मना..

वाट प्रिती स्पर्श नवा, तप्त निशा दाही दिशा
उष्ण श्वास उरी आस, जिणं व्यर्थ तुझ्या विना..

माझं तुझं एक विश्व, हात हाती धर प्रिये
तुटे कसे बंध आता, बघ चंद्र नभी घना..

 

लेखक –
प्रफुल्ल ठाकरे 
साहित्यिक तथा कवी,
अमरावती.

अभि. प्रफुल्ल ठाकरे
Author: अभि. प्रफुल्ल ठाकरे

लेखक अमरावती येथील रहिवासी असून अभियंता म्हणून सेवानिवृत्त आहे. सोबतच त्यांनी एम. ए. मराठी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण केलेले आहे. वाचणाची व लिहीण्याची आवड त्यांनी जोपासली आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक कथा, कविता, लेख लिहीलेले आहे. सर्वच विषयावर ते प्रभावी व मनभावन लेखन करतात. अनेक दिवाळी अंक व मासिकातून त्यांचे लेखन प्रसिध्द झालेले आहे, तसेच वृत्तपत्रातून सातत्यपूर्ण त्यांचे कथा कविता लेख इत्यादी साहित्य प्रसिद्ध होत असतात. सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात..

Leave a Comment

अधिक वाचा