नागपूर – ९ ऑक्टोबर २०२६ महिन्यातील पहिला शुक्रवार जागतिक अंडी दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. मानवी आहारातील अंड्याचे महत्व लहान मुलांपासून वृद्धापर्यंत पोहोचवण्याकरिता पशुसंवर्धन विभागाने नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद मधील अंगणवाडी व शाळांमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या सर्व संस्था प्रमुखांनी ५७०० अंडी वाटप करून हा दिन साजरा केला.
आरोग्य विभागाच्या सभेत पशंसंवर्धन विभागाने नाश्त्यात अंडी व केळाचे वाटप केले. या प्रसंगी मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आरोग्य विभागाच्या सभेत अंडी हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टीक असल्याने या बाबत रूग्नांना महत्व पटवून तसेच मानवी आहारात अंडी महत्वाचे असल्याने आरोग्य विभागाने सुध्दा या बाबत व्यापक प्रमानात जनजागृती व प्रसिध्दी करण्याचे आवाहन केले. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुध्दा सभेत अंडी ही पौष्टीक आहार असल्याने नाश्त्यात हानीकारक/तळलेल्या पदार्था ऐवजी अंडयाचा वापर करावा तसेच आई-वडिलांनी मुलांना मैदया पासुन तयार केलेले महागड्या बिस्किट, पेस्ट्री, चिप्स इत्यादी पेक्षा रोजचे एक अंडे द्यावे असे आवाहन केले.

मानवी आहारात अंड्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. महागड्या सप्लिमेंट आणि प्रोटीन पावडरच्या जमान्यात स्वस्त, सहज उपलब्ध आणि सर्वात पौष्टिक असलेले अन्न म्हणजे अंडे. अंड्याला ‘निसर्गाचा मल्टीविटॅमिन’ म्हटले जाते. एका अंड्यात ६ ते ७ ग्रॅम उच्च दर्जाचे प्रोटीन असते. यात शरीराला लागणारे सर्व ९ अत्यावश्यक अमिनो ऍसिड असतात. शाकाहारी लोकांमध्ये प्रोटीनच्या कमतरतेसाठी अंडे हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. बाजारात विक्री ला येणारे अंडे हे निर्जीव असतात त्यामुळे दिवस वार न बघता कधी पण खउ शकतो. मेंदू आणि डोळ्यांसाठी वरदान असलेले, अंड्यातील पिवळ्या बलकात कोलीन भरपूर असल्याने मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्तीसाठी आवश्यक आहे.
गर्भवती महिलांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. यातील ल्युटीन आणि झॅक्सॅन्थिन हे दोन घटक डोळ्यांचे मोतीबिंदू आणि वयामुळे येणारे अंधत्वापासून संरक्षण करतात. हाडे मजबूत करून रक्त वाढवते, थकवा घालवण्यासाठी उपयुक्त वजन नियंत्रण आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. प्रोटीन मुलांच्या स्नायू, हाडे आणि उंची वाढीसाठी सर्वात आवश्यक आहे. रोज अंडे खाणाऱ्या मुलांची वाढ ४७% जास्त वेगाने होते, असे संशोधन सांगते.

मुलांचा मेंदू तल्लख होतो : अंड्यातील पिवळ्या बलकात कोलीन (Choline) नावाचा घटक असतो. हा घटक ६ महिने ते ५ वर्ष वयोगटात मेंदूचा विकास, स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. डोळे आणि हाडे मजबूत होतात त्यातील व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांची नजर तेज होते. व्हिटॅमिन D हे नैसर्गिकरित्या फक्त अंड्यातून मिळते. यामुळे कॅल्शियम शोषले जाऊन हाडे मजबूत होतात, मुडदूस (Rickets) आजार टळतो. यातील लोह आणि B12 नी रक्ताची कमतरता दूर होते, मूल सतत आजारी पडत नाही.

अंडी नेहमी पूर्ण उकडूनच खावी –
अर्धवट कच्चे किंवा ऑम्लेटपेक्षा पूर्ण उकडलेले अंडे जास्त सुरक्षित आणि पौष्टिक असते. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या डब्यात रोज एक अंडे दिल्यास त्यांची एकाग्रता आणि अभ्यासात प्रगती सुधारते.”रोजच्या डब्यात एक अंडे, मुलाचे आरोग्य राहील चंडे”
जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नागपूर चे अधिकारी डॉ. नीती फुके यांच्या नेतृत्वात हा स्तुत्य उपक्रम पार पडला.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.






