चांदीच्या दरात आठवड्यात ८००० रुपयांची घसरण, सोन्याचे दर देखील घसरले, जाणून घ्या नवे दर

SHARE:

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात २०२५ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचे दर वाढल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात ८००० रुपयांची घसरण झाली आहे. तर, सोन्याचे दर देखील घसरले आहेत. सोन्याच्या एका तोळ्याच्या दरात १६४८ रुपयांची घसरण झाली आहे.

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरडिसेंबरच्या एक्सपायरीच्या वायद्याचे २४ कॅरेट सोन्याचे दर १३२२९४ रुपयांच्या तुलनेत ८००९ रुपयांनी घसरले आहेत. शुक्रवारी सोन्याचा एका तोळ्याचा दर १२४१९५ रुपयांवर आहे. देशांतर्गत बाजारात या आठवड्यात सोन्याचे दर घसरले आहेत.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेले सोन्याचे दर पाहिले असता दिसून येतं की पाच दिवसांमध्ये सोन्याचे दर १६४८ रुपयांनी घसरले आहेत. १४ नोव्हेंबरला २४ कॅरेट सोन्याचा दर १२४७९४ रुपयांवर बंद झाला होता. २१ नोव्हेंबरला सोन्याचा दर १२३१४६ रुपयांवर आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर १२०१९० रुपये एक तोळा, २० कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर १०९६०० रुपये, १८ कॅरेट सोन्याचा एखा तोळ्याचा दर ९९७५० रुपये तर १४ कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर ७९४३० रुपयांवर आहे.

आयबीजेएच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेले सोन्याचे दर देशभर सर्वक्ष सारखेच असतात. प्रत्येक शहरात सोन्याचे दर एक ते दोन हजार रुपयांनी वेगळे असू शकतात. सोन्यावर ३ टक्के जीएसटी आकारला जातो.

सोन्याप्रमाणं चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. कमोडिटी एक्सचेंज ते देशांतर्गत बाजारात चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर एक किलोच्या चांदीच्या वायद्याचे दर १४ नोव्हेंबरला १५६०१८ रुपयांवर होते. ते, शुक्रवारी २१ नोव्हेंबरला १५४०५२ रुपयांवर आले. या हिशोबानं चांदीचे दर १९६६ रुपयांनी घसरले आहेत.

देशांतर्गत बाजाराचा विचार केल्यास १४ नोव्हेंबरला चांदीचे दर १५९३६७ रुपये होते. तर, २१ नोव्हेंबरला दर १५१३७५ रुपयांवर आले होते. त्या हिशोबानं चांदीचे दर ८२३८ रुपये एक किलो होते.

Leave a Comment

अधिक वाचा