
रोहित शर्माची २०२६ टी२० विश्वचषकासाठी ब्रँड अॅम्बेसडर म्हणून निवड करण्यात आली आहे. आयसीसी चेअरमन जय शाह यांनी स्वतः ही माहिती देत रोहितची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, गेल्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावरून घसरलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर गेला आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत रोहितने एकही वनडे सामना खेळलेला नाही. तरीही तो पुन्हा नंबर वनचा दर्जा मिळवण्यात यशस्वी ठरला. यंदाच्या रँकिंगमध्ये वरच्या क्रमांकांवर फारसे बदल झाले नाहीत, मात्र टॉप-१० मधील खालच्या स्थानांवर थोडे फेरबदल दिसून आली आहेत.
रोहित शर्मा पुन्हा नंबर वन फलंदाज
भारतीय संघाचे अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा हा ७८१ रेटिंगसह पुन्हा आयसीसी वनडे रँकिंगमध्ये सर्वात वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या स्थानी गेलेला न्यूझीलंडचा डेरिल मिचेल आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहेत. कारण, आयसीसीच्या नियमानुसार कोणतीही टीम खेळत असताना त्या संघातील एखादा खेळाडू विश्रांतीवर असेल तर त्याची रेटिंग हळूहळू कमी होत जाते. न्यूझीलंडने मिचेलशिवाय सामने खेळल्यामुळे त्यांची रेटिंग घसरली आणि तो आता ७६६ वर आला आहे.




