‘हात जोडते मी…’, सूरज चव्हाणच्या लग्नात जान्हवी किल्लेकर चा भर मंडपात संताप; माईक घेत पाहुण्यांना सुनावलं, काय घडलं ?

SHARE:

मुंबई : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती.त्याचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर इतकी चर्चा झाली, लग्नपत्रिका व्हायरल झाली होती, त्यामुळं लग्नस्थळी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळं लग्नसोहळ्यात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. याचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. पण या लग्नसोहळ्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी तब्बल ५० हून अधिक बॉडीगार्ड होते. तरीही व्हायचा तो गोंधळ झालाच. यानंतर सूरजच्या लग्नात सहभागी झालेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिनं ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.

लग्नमंडपात इतकी गर्दी झाली होती की, लग्नवेळेवर लागणार की नाही, असं वाटत होतं. त्यानंतर जान्हवीनं माईक हातात घेतला आणि आलेल्या पाहुण्यांना विनंती वजा दम दिल्याचं पाहायला मिळालं. अरे आपण सूरजच्या लग्नाला आलोय ना…त्यांचं लग्न तर लागुदेत आधी, त्याचं लग्न लागू नये असं वाटतंय का तुम्हाला? तो सूरज आतमध्ये बसलाय, वैतागलाय तो. कृपया थोडं सहकार्य करा… असं जान्हवीनं माईकवर म्हटलं. मी हात जोडून सांगते, पण ऐका माझं. सगळ्यांचीच डोकी फिरली आहेत, पण आता सूरजला बाहेर तर येऊद्या, कोणी काही करू नका…त्याच्यासाठी तुम्ही इतक्या मोठे संख्येने आला आहात..असं म्हणत जान्हवीनं पाहुण्यांना गोंधळ करू नका असं सांगितलं.

दरम्यान, सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकारांपैकी फक्त जान्हवीच सूरजच्या लग्नाला आल्याचं दिसून आलं. तिनं करवली म्हणून तिचं कर्तव्य पूर्ण केलं. अगदी हळद, मेंदी, गावदेव अशा सगळ्या सोहळ्यात ती सूरजसोबत होती. तर लग्नातही तिनं बरंच सहकार्य केलं…त्यामुळं नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

वरातीतही गोंधळ
तर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय यात पांढऱ्या घोडीवर बसून सूरजची वरात निघाल्याचं पाहायला मिळतंय. यात तो घोड्यावर बसला आहे. पण गाण्याच्या तालावर थिरकताना घोडा अनियंत्रित झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळं सूरज चव्हाणच्या डोक्यावरील नवरदेवाचा फेटादेखील पडला होता.

Leave a Comment

अधिक वाचा