त्यांनी टीव्हीवर ‘काहे दिया परदेस’ चा प्रोमो पाहिला अन्…सायली संजीवनं सांगितला अशोक सराफ यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा..

SHARE:

मुंबई : काही नाती ही रक्ताच्या पलीकडची असतात, असं म्हटलं जातं. असंच नात अभिनेत्री सायली संजीव हिचं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांच्यासोबत आहे. अशोक सराफ आणि निवेदिता यांनी सायलीला त्यांची लेक मानलं आहे. तर सायली देखील अशोक मामांना पप्पा अशी हाक मारते. त्यांच्यातला हा खास बॉन्ड नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.

सायली अशोक सराफ यांना पप्पा अशी हाक मारते, याबद्दल तिनं अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सायलीनं अशोक सराफ यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितलाय.

सायली संजीव हिनं काहे दिया परदेस या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. याच मालिकेचे प्रोमो जेव्हा टीव्हीवर झळकले तेव्हा अशोक सराफ यांनी पहिल्यांदा सायलीला पाहिलं होतं. यावेळी दोघांची ओळख असायचा काही प्रश्नच नव्हता. सायली जेव्हा या मालिकेत काम करत होती तेव्हा तिचा एक मित्र अशोक सराफ यांच्या सिनेमात काम करायचा. त्यावेळी अशोक सराफ यांनी त्या मित्राला सांगितलं की, म्युझिक लॉन्चला येताना मला घेऊन ये. त्याच कार्यक्रमात आमची पहिली भेट झाली होती. तेव्हापासून आमचा हा वडील आणि लेकीच्या नात्याचा जो प्रवास सुरू झालाय, तो आजही सुरू आहे…असं सायली म्हणाली.

मला त्यांनी जेव्हा स्क्रिनवर पाहिलं तेव्हा त्यांनी मी निवेदिता मॅम यांच्या सारखी दिसले, मी हसतेही तसंच…असं त्यांना वाटत होतं, असंही तिनं म्हटलं. तर अशोक सराफ सरांनी मला स्वतःहूनच सांगितलं की तू मग मला काय म्हणशील? मग तू मला पप्पा म्हण. ते खूप दिग्गज कलाकार आहेत.मालिकेचे प्रोमो आले तेव्हाही सगळ्यांनी याच कमेंट सुरू केल्या होत्या की ही निवेदिता सराफ यांची कॉपी आहे. ती त्यांची मुलगी आहे का, माझा त्यांच्याशी काही संपर्क नव्हता. पण ते न चुकता दररोज ८. ३० ला पॅकअप करायचे आणि ९. ला टीव्ही लावून बसायचे. मालिका बघायचे. सायलीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिचा कैरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा