१०० वर्ष जुने इयररिंग्स अन् हनुमान असलेला बाजूबंद घालून नीता अंबानींनी वेधले लक्ष, साधेपणा चाहत्यांना भावला…

SHARE:

मुंबई – मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या देशातील फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या देखील जातात. त्यांच्या प्रत्येक लूकमध्ये केवळ फॅशनेबल नसतो तर भारतीय वारसा, कलाकुसर आणि परंपरेचा सुंदर संगमही दिसतो. याचीच झलक त्यांच्या अलीकडील अवतारात पुन्हा एकदा दिसून आली. रिलायन्सच्या स्वदेश या उपक्रमाच्या फ्लॅगशिप स्टोअरच्या विशेष सेलिब्रेशनसाठी नीता अंबानी यांनी खास कार्यक्रम आयोजित केला होता, जिथे देशभरातील कलाकार आणि कारागिरांचा मानाने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी परिधान केलेली निळ्या रंगाची एलिगंट साडी त्यांच्या शाही व्यक्तिमत्त्वाला आणखी उठाव देणारी ठरली. पण यावेळी साडीपेक्षा त्यांचे दागिने चर्चेचा खरा केंद्रबिंदू ठरले. शंभर वर्षे जुनी विंटेज कानातली असोत किंवा देवांची प्रतीमा असलेली बाजूबंध त्यांचा प्रत्येक दागिन्यांनी नीतांचा लूक अधिक उठून दिसला आणि त्यांच्या पारंपरिक स्टाइलची अनोखी ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

या खास कार्यक्रमासाठी नीताने स्वदेशमधील अप्रतिम मोरपंखी रंगाची बनारसी साडी नेसली होती. साडीवर केलेली नाजूक मीना नक्षी आणि पारंपारिक विणकाम तिच्या लूकला अधिकच राजेशाही स्पर्श देत होते. कढौआ ही बनारसी साड्यांची ओळख असलेली प्राचीन विणकाम पद्धत असून, प्रत्येक नक्षी अलगद जरी किंवा रेशमी धाग्यांनी स्वतंत्रपणे विणली जाते. या कौशल्यपूर्ण कलाकुसरीमुळे साडीला एक वेगळीच शोभा मिळते.

 

Leave a Comment

अधिक वाचा