इंजिनियर आकाश जाधव यांची भाजपा अभियंता सेल अध्यक्षपदी निवड…

SHARE:

अमरावती – राज्यात लवकरच महानगरपालिका चे निवडणूक होणार आहेत. सर्व पक्ष आपल्या आपल्या संघटन बांधणी कडे लक्ष केंद्रित करत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी अमरावती शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या नेतृत्वात भाजपा अभियंता सेल अमरावती शहर अध्यक्षपदी इजी. आकाश जाधव यांची निवड करण्यात आली.
आकाश जाधव यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान व सामाजिक दृष्टिकोन या सर्व बाबी लक्षात घेता भाजपा शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी आकाश जाधव यांची अभियंता सेल च्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली. या नियुक्तीचे बद्दल आकाश जाधव यांनी डॉ. नितीन धांडे व भारतीय जनता पार्टी चे आभार मानले.
इंजि. आकाश जाधव यांच्या निवडी बद्दल भाजपा शहर उपाध्यक्ष धीरज बारबुद्धे, संत गाडगे बाबा मंडळ अध्यक्ष अभिजित वानखडे, सरचिटणीस अमोल आगरकर, गणेश खोत, आकाश दानखडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

अधिक वाचा