
राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज ११ डिसेंबर २०२५ , आजचा वार गुरूवार आहे. आज मार्गशीर्षचा तिसरा गुरूवार असल्याने आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज उत्तम आत्मविश्वास आणि धडाडीच्या जोरावर कामाचा फडशा पाडाल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज एखादे ध्येय मनाशी निश्चित कराल, स्वतंत्रपणे कार्य करण्यात तुम्हाला आनंद वाटेल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे याल, पुढे आलेल्या संधीचा योग्य उपयोग कसा करून घ्यायचा हे तुम्ही जाणून घ्याल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज महिलांच्या हातून चांगले काम होईल, कोणतीही गुंतवणूक योग्य विचाराने व्यवस्थित माहिती घेऊन करा.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज पैसे मिळाले तरी त्याला खर्चाच्या अनेक वाटा फुटल्यामुळे थोडी चिडचिड होईल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनो आज घरापासून दूर राहण्याचे योग वारंवार येतील, त्यामुळे घरातील लोकांची चिडचिड सहन करावी लागेल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज जवळच्या माणसांना तुमच्या स्वभावाचा थोडा त्रास होईल, कोणतेही निर्णय पटकन घेणार नाही.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या धडाडीला विचाराचे स्वरूप येऊ शकते, त्यासाठी काळजी घ्या.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज काटेकोर जीवनाचा कंटाळा येईल, महिलांची प्रत्येक गोष्टीत आनंद घेण्याची प्रवृत्ती राहील.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज घरामधील नवीन येणाऱ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज हातून कोणता विचार होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज आर्थिक बाबतीत चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता, कर्जबाजारी असणाऱ्यांनी वेळेवर हप्ते फेडण्याची खबरदारी घ्यावी.





