‘धुरंधर’ ने १२ व्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवलं, कमाईच्या बाबतीत ठरला रणवीर सिंगचा नंबर १ सिनेमा…

SHARE:

मनोरंजन विश्व् – रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, सारा अर्जुन, गौरव गेरा अशा तगड्या कलाकारांची फौज असणारा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करतो आहे. बाराव्या दिवशीही या चित्रपटाची जादू उतरलेली नाही आणि आठवड्याच्या मध्यातही दणक्यात कमाई सुरू आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा कमाईच्या बाबतीत रोज नवे विक्रम रचतो आहे. २०२५  या वर्षातील हिट सिनेमांच्या यादीत ‘धुरंधर’ ने आपली जागा केव्हाच निश्चित केली होती, आता देशभरात ४००  कोटींचा आकडा पार केला आहे.

सोशल मीडियापासून राजकीय मंचांपर्यंत ‘धुरंधर’ ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते आहे. रीलिजनंतर दुसऱ्या आठवड्याची कमाई पहिल्या आठवड्यापेक्षा जास्त आहे. शिवाय पहिल्या सोमवारपेक्षाही जास्त कमाई दुसऱ्या सोमवारी झाली. दुसऱ्या सोमवारी म्हणजेच, १५  डिसेंबर रोजी या चित्रपटाने २३.२५  कोटी रुपये कमावले होते, तर मंगळवारी (१६  डिसेंबर) ही कमाई ३०.५  कोटी रुपयापर्यंत वाढली आहे. सॅकनिल्कने ही आकडेवारी दिली आहे. एकूण या चित्रपटाने देशभरात ४११.१५  कोटींची कमाई केली.

रणवीर सिंगचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा

या जबरदस्त कामगिरीनंतर ‘धुरंधर’ हा रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. याआधी ‘पद्मावत’ हा सिनेमा रणवीरचा सर्वाधिक कमाई केलेला सिनेमा होता, दीपिका पादुकोणसोबतच्या त्या चित्रपटाने ३०२.१५ कोटींची कमाई केली होती. आता ‘धुरंधर’ ने ही कमाई केव्हाच मागे टाकली आणि तो रणवीरचा ‘नंबर १’ सिनेमा ठरला आहे. शिवाय आणखी एक रेकॉर्ड या चित्रपटाने मोडला. १२  व्या दिवसाचे कलेक्शनच्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा : द रुल – भाग २’ पेक्षा जास्त आहे. या सिनेमाने बाराव्या दिवशी २६.९५  कोटींची कमाई केली होती.

अक्षय खन्ना च्या या सिनेमाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, या सिनेमाने ११  दिवसात ५८८  कोटी रुपये कमावले आहेत. परदेशातील कमाईचा आकडा १३०.५०  कोटींवर पोहोचला आहे. बाराव्या दिवसाची आकडेवारी समोर आल्यानंतर या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल.

Leave a Comment

अधिक वाचा