अनुभवी गुंतवणूकदारही आश्चर्यचकित; १७०००% परतावा, कोट्यवधींचा नफा, पण घातला गोंधळ…

SHARE:

अर्थ – शेअर बाजारातून श्रीमंत होण्याचे प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वप्न असते, पण एका अतिशय शक्तिशाली महिला अमेरिकन राजकारणी नेत्याने कमावलेल्या परताव्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या गुंतवणुकीवर आता उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रिपब्लिकन काँग्रेसवुमन अण्णा पाऊलींना लुना यांनी अलीकडेच पेलोसी यांचे शेअर बाजारातील परतावे असामान्य आहेत आणि इनसाइडर ट्रेडिंगच्या वापरावर आधारित असू शकतात असा दावा केला आहे.

२० डिसेंबर रोजी टर्निंग पॉइंट यूएसएच्या अमेरिकाफेस्ट कार्यक्रमात दिलेल्या भाषणात लुनाने नॅन्सी पेलोसीला “रियल Wolf of Wall Street” असे बोलून संबोधले. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये पेलोसीच्या गुंतवणुकीने अनेक दशकांपासून प्रमुख निर्देशांक आणि अगदी टॉप गुंतवणूकदारांनाही मागे टाकले, असे लुना म्हणताना दिसत आहेत.

अमेरिकन राजकारणात
खळबळजनक आरोप
एवढी जबरदस्त कामगिरी काही विशेष फायद्याशिवाय होऊ शकत नाही, असा त्यांनी युक्तिवाद केला. पण, त्यांच्या विधानासोबत कोणतेही कागदपत्र किंवा तपास अहवाल सादर केला नाही. दरम्यान, हे आरोप नवीन नाहीत. रिपब्लिकन वर्तुळातून यापूर्वीही अशीच विधाने आली आहेत. नोव्हेंबरमध्ये रिपब्लिकन नॅशनल कमिटीच्या प्रवक्त्या किअरस्टेन पेल्स यांनी नॅन्सी पेलोसी यांनी ‘पदावर असताना त्यांच्या गुंतवणुकीत कमालीची वाढ केली,’ असा दावा केला होता.

मात्र, पण तेव्हा आणि आजही कोणत्याही सरकारी संस्थेने किंवा नियामकाने कोणतीही कारवाई केलेली नाही. दुसरीकडे, सार्वजनिक अहवाल नक्कीच वेगळे चित्र दाखवतात. एका अहवालानुसार पेलोसी आणि त्यांचे पती पॉल पेलोसी यांनी ३७ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत शेअर बाजारातून अंदाजे १०,८००  कोटी रुपयांचा नफा कमवल्याचे समोर आले आहे.

पेलोसी कुटुंबाच्या पोर्टफोलिओचा परतावा
१९८७  मध्ये काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी त्यांचे शेअरहोल्डिंग अंदाजे ५०-६५  कोटी रुपये म्हणजे अंदाजे $१.५  अब्ज होते तर, नोव्हेंबर २०२५ पर्यंत त्यांचे शेअरहोल्डिंग अंदाजे ११,१०० कोटी रुपये किंवा अंदाजे $१.१  अब्जपर्यंत वाढल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी, यामध्ये परतावाही जोडल्यास पेलोसी कुटुंबाच्या पोर्टफोलिओने एकूण सुमारे १६,९३०% परतावा दिला. त्याच कालावधीत डाऊ जोन्सचा परतावा अंदाजे २,३००% होता.

आर्थिक खुलाशांवरून पेलोसी दाम्पत्याचे अल्फाबेट, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, एनव्हीडिया, नेटफ्लिक्स आणि इतर अनेक प्रमुख टेक कंपन्यांमध्ये हिस्सेदारी असल्याचे दिसून येते. नोव्हेंबर २०२५  पर्यंत त्यांची एकूण संपत्ती अंदाजे २३,२००  कोटी रुपये इतकी आहे, जी १९८७  मध्ये अंदाजे २.५  अब्ज रुपये होती.

पोर्टफोलिओचा १७  हजार टक्क्यांचा आश्चर्यकारक परतावा
पेलोसी यांच्या पोर्टफोलिओने वर्षभरात १७,००० % परतावा दिला असून सार्वजनिक आर्थिक खुलाशानुसार, पेलोसी कुटुंबाने गेल्या काही वर्षांत अनेक प्रमुख टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यातअल्फाबेट, अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, एनव्हीडिया, नेटफ्लिक्स, ब्रॉडकॉम, सेल्सफोर्स, पालो अल्टो नेटवर्क्स, टेम्पस एआयमध्ये गुंतवणूक केली. यापैकी अनेक स्टॉकने वेगवेगळ्या वेळी १०००% पेक्षा जास्त परतावा दिला.

दरम्यान, सध्या नॅन्सी पेलोसी यांच्यावर कोणत्याही नियामकाने इनसाइडर ट्रेडिंगचा आरोप लावलेला नाही. त्यामुळे, हा विषय मुख्यत्वे राजकीय वक्तृत्व, आकडेवारी आणि प्रश्नांचा विषय असल्याचे दिसून येते.

Leave a Comment

अधिक वाचा