कधी १ रुपयांत मिळायचे १० डॉलर, आज खातोय मार; कधी झाली मोठी घसरण…

SHARE:

 

अर्थ – भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घसरत्या रुपयाला सांभाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. यासाठी, मध्यवर्ती बँकेने अंदाजे $१२  अब्ज विकले असून आता विक्रमी पातळीवरून रुपया काही प्रमाणात सावरला आहे. अलीकडेच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ९१  च्या वर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती, जो ९१.८०  वर आला. पण, त्यानंतर त्यात काही सुधारणा दिसून आली कोण opआहे.

रुपयाची यावर्षी सर्वात वाईट कामगिरी

यावर्षी रुपया सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या प्रमुख चलनांपैकी बनला आहे. यावर्षी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ५ % पेक्षा जास्त घसरले असून फक्त तुर्की चलन लिरा आणि अर्जेंटिनाचे चलन पेसो यांनी भारतीय रुपयापेक्षा वाईट कामगिरी केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा दबाव आणि भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करारातील विलंबामुळे निर्माण झालेल्या भीतीमुळे रुपया घसरणीचा कल सुरूच राहण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

१००  वर्षांपूर्वी म्हणजे ब्रिटिश काळात १९२५  मध्ये रुपया डॉलरपेक्षा लक्षणीयरीत्या मजबूत होता. bookmyforex.com नुसार, एक रुपया १०  डॉलर्सच्या समतुल्य होता आणि १९४७  मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा एक डॉलर ३.३  रुपयांना होता. त्यानंतर, १९५०  पर्यंत एका डॉलरचे मूल्य ४.७६  रुपयांपर्यंत वाढले तर, १९६५  पर्यंत याच पातळीवर स्थिरावले, पण पुढील वर्षी १९६६ मध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत ७.५  पर्यंत घसरला.

१९८०  मध्ये INR डॉलरच्या तुलनेत ७.८६  आणि १९९०  मध्ये १७.५  वर पोहोचले. त्यानंतर, २००० सालापर्यंत एका डॉलरचे मूल्य ४४.९४  रुपयांवर पोहोचले असून २०१०  मध्ये एका डॉलरचे मूल्य ४५.७३ रुपये, तर २०२०  पर्यंत ७६.३८ रुपयांवर आले. अशा स्थितीत, डॉलरच्या तुलनेत रुपया ६५ वरून ७०  वर पोहोचण्यासाठी १९१५  दिवस लागले. त्यानंतर ७०  वरून ७५  वर पोहोचण्यासाठी ५८१  दिवस, ७५  वरून ८० वर पोहोचण्यासाठी ९१७  दिवस आणि नंतर ८५  वरून ८०  वर पोहोचण्यासाठी ८१९  दिवस लागले.

अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली देश असून देशाचे चलन, डॉलर जागतिक चलन म्हणून ओळखले जाते. डॉलर जगभर जवळजवळ ८०  वर्षांपासून वर्चस्व गाजवत असून आंतरराष्ट्रीय व्यापारात सर्वत्र स्वीकारले जाते. याशिवाय, जगभरातील मध्यवर्ती बँकांकडे असलेल्या परकीय चलन साठ्यात डॉलरचा वाटा मोठा आहे. युरो जगातील दुसरे मोठे चलन असले तरी डॉलरच्या मूल्याच्या जवळपासही नाही. डॉलर अमेरिकेच्या ताकद आणि अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.

पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जगातील ९ चलन डॉलरपेक्षाही मजबूत आहेत. यामध्ये कुवैती दिनार आघाडीवर असून एका कुवेती दिनारचे मूल्य ३.२५  डॉलर इतके आहे. त्यांनतर, बहरीनी दिनार २.६५  डॉलर्स इतके आहे. त्याचवेळी, ओमानी रियाल देखील अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त मौल्यवान असून सध्या एका ओमानी रियालचे मू २.६०  अमेरिकन डॉलर इतके आहे. त्याचप्रमाणे जॉर्डनचे चलन दिनार, ब्रिटिश पाउंड स्टर्लिंग, जिब्राल्टर पाउंड, केमन आयलंड डॉलर, स्विस फ्रँक आणि युरो देखील डॉलरपेक्षा मजबूत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा