
राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज २६ डिसेंबर २०२५ , आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये पुढे जाता येईल कोणाच्याही विरोधाला न जुमानता स्वतंत्र वृत्तीने काम कराल.
वृषभ रास (Taurus)
आवश्यक तिथे लोकांच्या व्यवस्थित संपर्कात याल विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन रास (Gemini)
काम काय करावे याचा विचार करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा.
कर्क रास (Cancer)
आज तुमचे व्यक्तिमत्व अनेक अंगांनी फुलून जाईल महिलांनी वेगळ्या अनुभवाची श्रीमंती मिळवण्यासाठी स्वतःच्या कोशातून बाहेर यावे.
सिंह रास (Leo)
आज मित्रमंडळींमध्ये रमून जाल तुमच्या ओळखी भरपूर होतील.
कन्या रास (Virgo)
विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती झाली तरी प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे ठरेल.
तूळ रास (Libra)
अचानक प्रवासाचे योग येतील परंतु प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेणे गरजेचे ठरेल.
वृश्चिक रास (Scorpio)
नवीन कल्पना सुचतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्नही कराल.
धनु रास (Sagittarius)
संशोधनात्मक कार्यात यश मिळेल वैवाहिक जीवनात जोडीदाराचा मूड सांभाळावा लागेल.
मकर रास (Capricorn)
विवाह करायचा आहे त्यांचे विवाह जमतील तुमच्या आधुनिक विचारांना हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही.
कुंभ रास (Aquarius)
आज मौज मजा निरर्थक वेळ वाया घालवणे तुम्हाला आवडणार नाही.
मीन रास (Pisces)
व्यवसाय मध्ये आवश्यक असणाऱ्या भांडवलाची गरज कर्ज काढून भागवता येईल.
(टीप : वरील सर्व बाबी रयत रक्षक न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रयत रक्षक न्यूज कोणताही दावा करत नाही.)





