
राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज २८ डिसेंबर २०२५, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
वाहने सावधानतेने चालवा व्यवसायामध्ये नवीन प्रोजेक्टसाठी गुंतवणूक कराल.
वृषभ रास (Taurus)
महिलांच्या सुप्त कलांना प्रोत्साहन मिळेल घरातील लोकांच्या भावनांचा विचार करावा लागेल.
मिथुन रास (Gemini)
एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष देत राहिल्यामुळे संधी निघून जाऊ शकतात.
कर्क रास (Cancer)
जोडीदाराशी झालेल्या वैचारिक मतभेदांमध्ये तुम्हाला दोन पावले मागे यावे लागणार आहे.
सिंह रास (Leo)
आज कोणतेही टोकाचे निर्णय घ्यायचे नाहीत असे ठरवून टाका महिलांना घरातील जबाबदाऱ्या सांभाळावे लागतील.
कन्या रास (Virgo)
आज हट्टीपणामुळे स्वतःचे नुकसान करून घ्याल कोणताही अहंकार ठेवू नका.
तूळ रास (Libra)
ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या म्हणीनुसार वागणूक ठेवावी लागेल.
वृश्चिक रास (Scorpio)
कितीही अडथळे आले तरी स्वतःची प्रगती करून घ्याल घरातील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी त्याग करावा लागेल.
धनु रास (Sagittarius)
आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही हात राखून खर्च कराल त्याची थोडी चर्चा होईल.
मकर रास (Capricorn)
लहान लहान गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरी जास्त निराश होऊ नका कारण परिस्थिती सुधरेल.
कुंभ रास (Aquarius)
महिला जरा जास्तच एकलकोंड्या बनतील परंतु समाजात मान वाढेल.
मीन रास (Pisces)
बुद्धीच्या जोरावर अनेक क्षेत्रे पादाक्रांत कराल व्यवसायात इतरांच्या मनाचा विचार जास्त कराल.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





