भांडुपमध्ये बसने १३ प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं?

SHARE:

मुंबई – भांडुप रेल्वे स्थानक येथे काल रात्री भीषण अपघात घडला. २९  डिसेंबरच्या रात्री साडेनऊच्या दरम्यान रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर बस गेल्याने ४  जणांचा जागीच मृत्यु झाला. तर १० जण जखमी झाले आहेत.

जखमींना राजेवाडी व अग्रवाल रुग्णालयात दाखल केले गेले असून चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

बससाठी अनेक प्रवासी रांगेत उभे होते. इतक्यात मागून बस येते आणि प्रवाशांच्या दिशेने धडकते. बस जोरात येताच महिलांना जागेवरुन हलताही आलं नसल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. बस मागे घेताना चालकाचा ताबा सुटला आणि सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात स्थळाजवळील एका कपड्यांच्या दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा