आमच्या विरोधात उभे राहण्याचं धाडस कसं केलं, भाजप उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची एनसपीच्या उमेदवाराला धमकी

SHARE:

पिंपरी चिंचवड – मागील काही दिवासांपूर्वी सोलापुरात राजकीय वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या करण्यात आली आहे. अशातच आता पिंपरी चिंचवडमध्ये विरोधी उमेदवाराला धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपरीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घालून शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतेच नाही तर आमच्या विरोधात उभे राहण्याचं धाडस कसं काय केलं, अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

३३  वर्षीय डॉ. महिलेने तशी फिर्याद दिली आहे. प्रभाग क्रमांक २१  मधील विरोधी उमेदवार यांच्या घरात भाजप कार्यकर्ते शिरले, असा आरोप केला जात आहे, तसे व्हिडीओ समोर आणून हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.आमच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत कशी काय केली, अशी धमकी दिल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे. आरोपी हे विरोधी पॅनल भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते असल्याचा त्यांचा आरोप आहे.

ही घटना रविवारी रात्री १२:१५  च्या सुमारास नवमहाराष्ट्र स्कुल पिंपरी गावातील घराजवळ घडली. स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरून जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे, इतर काही जणांनी घरासमोर येऊन स्वप्नील वाघेरे याने आमच्या परवानगी शिवाय घरात प्रवेश केला. माझे चुलत सासरे यांना अश्लील शिवीगाळ केली. तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याची हिंमत कशी काय केली, तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तक्रारदार डॉ.महिलेला देखील शिव्या देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अश्लील वर्तन करत आरोपींनी विनयभंग केला. त्याचबरोबर दिराला धक्काबुक्की केली. आजेसासू यांना ढकलून दिले, दुचाकी वाहनांचं नुकसान केलं. दहशत निर्माण केली. असे अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडीओही फिर्यादीकडून पोलिसांना सादर करण्यात आला असून त्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

अधिक वाचा