छ. संभाजीनगर – संभाजीनगरमध्ये सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली आहे. तर या प्रकरणात कुटूंबातील १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगरमध्ये हुंडा न दिल्यामुळे सुनेचा छळ करण्यात आला आहे. या प्रकरणात संभाजीनगरमध्ये एका महिलचा मृत्यु झाला आहे.
सासरच्यांनी मृत्युचा खोटा प्लॅन रचला होता, हे उघडकीस आले आहे. संभाजीनगरमधील सिल्लोड तालूक्यतील पळशी येथे ही घटना घडली आहे. १९ वर्षीय करुणा निकमने मृत्यूच्या, काही तास आधी आपल्या वडिलांकडे, रडत मदत मागितली होती. मात्र, गरिबी आणि परिस्थितीमुळे वडिलांना आपली लेक कायमची सोडून जाईल, याची कल्पनाही नव्हती.
सिल्लोड तालुक्यातील पळशी येथे घडलेल्या, या घटनेने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सासरच्या मंडळींनी रचलेला ’अपघाती मृत्यूचा’ कट पोलिसांनी उधळून लावला आहे. २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १९ वर्षीय करुणा निकम हिचा मृतदेह, गावातीलच एका विहिरीत सापडला आहे. करुणा पाणी भरण्यासाठी गेली असता पाय घसरून, विहिरीत पडली आणि तिचा मृत्यू झाला, असा खोटा प्लॅन पती सुभाष निकम आणि सासरा गौतम निकम यांनी रचला होता. त्यांनी हीच माहिती, करुणाचे वडील दीपक सोनवणे यांना दिली.
मात्र, आपल्या लेकीच्या सासरच्यांच्या वागण्यातील विसंगती, आणि गोंधळ पाहून वडिलांना संशय आला. हुंड्यासाठी अमानुष छळ केला आहे, असे तपासात समोर आले आहे. करुणाच्या लग्नात ठरलेला ५० हजार रुपयांचा हुंडा तिचे वडील, परिस्थिती अभावी देऊ शकले नव्हते. याच कारणावरून पती आणि सासरा तिला, सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. सासऱ्याला आपल्या दुसऱ्या मुलाचे लग्न करायचे होते आणि, त्यासाठी लागणाऱ्या पैशांची सोय करण्यासाठी, तो करुणावर माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत होता.
मृत्यूच्या आधी रात्रीचा तो फोन १९ जानेवारीच्या रात्री करुणाने, वडिलांना फोन करून आपल्यावरील अन्यायाची माहिती दिली होती. सासरचे लोक आपल्याला मारहाण करत असून, आपल्याला तिथे राहणे अशक्य झाले असल्याचे, तिने रडत सांगितले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी, तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा खोटा बहाणा सासरच्यांनी केला असला, तरी छळाला कंटाळून करुणाने आत्महत्या केल्याची माहिती, करुणाचे वडील दीपक सोनवणे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली आहे.
या प्रकरणात तिचा सासरा, पती आणि कुटूंबातील १० जणांवर, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी, तत्काळ हालचाली केल्या आहेत. पोलिसांनी तपास केल्यावर, खरी माहिती मिळाली आहे. या प्रकरणात पती सुभाष निकम आणि सासरा गौतम निकम यांच्यासह, कुटुंबातील एकूण १० जणांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांत, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पती आणि सासऱा या दोघांना, बेड्या ठोकल्या असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात सिल्लोड पोलिस अधिक तपास करत आहेत.




