सांगली – बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. घरासमोर खेळत असलेल्या ४ वर्षाच्या मूलावर बिबट्याने झडप घातली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालूक्यात बिऊर गावात ही घटना घडली आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्याच्या बिऊर गावामध्ये बिबट्याने एका ४ वर्षीय मुलावर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
राज्यभरात गेल्या काही महिन्यांमध्ये बिबट्याने शेतकरी बांधव व सर्व सामान्य नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील शहरी भागात व ग्रामीण भागात ही बिबट्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातून राज्याच्या ग्रामीण भागातून शहराकडे धाव घेतलेल्या बिबट्याची संख्या वाढत चालली आहे. व राज्याच्या ग्रामीण बिबट्याच्या अचानक हल्ला करण्यामूळे मोठी गंभीर समस्या बनली आहे.
राज्यातील अनेक भागात अनेकदा बिबट्याने स्थानिक नागरिकांवर हल्ला केला आहे. काही ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक लोकांचा जीव घेतल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अशातच राज्यात सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. शिराळा तालुक्याच्या बिऊर गावामध्ये बिबट्याने एका चार वर्षीय मुलावर हल्ला केला आहे. या बिबट्ययांच्या हल्ल्यात या लहान 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सांगलीतील शिराळा परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये बिबट्याची मोठी भीती पसरली आहे. शिराळा तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या भीती पसरली आहे. बिबट्याच्या दहशतीखाली लोक आहेत.
शिराळा परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. व वनखात्याला बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. सांगलीतील शिराळा तालूक्यात बिबट्याने घरासमोर खेळत असलेल्या एका लहान मुलावर अचानक झडप घालून ओढत अर्धा ते पाऊण किलोमीटर नेले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात बिबट्याच्या या सततच्या हल्ल्याच्या घटनांमुळे, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, लहान मूलांमध्ये व डोंगर भागातील, जंगल भागातील स्थानिक नागरिकांमध्ये ही बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे राज्यातील वन विभागावर नागरिक संताप व्यक्त करित आहेत. शिराळा मध्ये ही बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्यानंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. तर नागरिकांच्या डोळ्यादेखत बिबट्याने अचानक हल्ला केल्यामूळे लहान मूलाचा मृत्यू झाला आहे. मात्र काही उपस्थितांनी बिबट्याचा पाठलाग केल्याने बिबट्याने मुलाला सोडले, मात्र या हल्ल्यात त्या लहान मूलाचा मुलाचा मृत्यू झाला आहे. अशातच मुलाचा मृतदेह शिराळा तालूका ग्रामीण रुग्णालयात आणला. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात, बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे बिबट्याची दहशत आणखी वाढली आहे.





