चंद्रपूर – सत्तास्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा दिल्यामूळे शिवसेनेच्या ६ नगरसेवकांवर कारवाई होणार आहे. राज्यात महानगरपालिका सत्तेसाठी नवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनाप्रमूख उद्धव ठाकरे यांना न विचारता चंद्रपूरात शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामूळे जिल्हाप्रमूख संदीप गिऱेसह ६ नगरसेवकांवर कारवाई होणार आहे, असे ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सत्तास्थापनेच्या नाट्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ६ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर झाला आहे. हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का आहे. उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरमध्ये भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चंद्रपूरमधील ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, पक्षनेतृ्त्त्वाला कोणतीही माहिती न देता परस्पर भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे ठाकरे गटाचे चंद्रपूरमधील जिल्हाप्रमुख संदीप गिऱे आणि शिवसेनेच्या 6 नगरसे वकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांना ३२ मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवाराला ३१ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे २ नगरसेवक गैरहजर राहिले. यामुळे बहुमताचा आकडा ३३ वर पोहोचला. एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी संजय राऊत यांनी चंद्रपूरमध्ये भाजपसोबत न जाण्याची भूमिका मांडली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. विरोधी पक्षात बसावे लागले तरी चालेल पण भाजपाची सत्ता स्थापन होईल, अशी भूमिका घेऊ नका असे संजय राऊत यांनी म्हटले होते. शिवसेनेला महापौरपद मिळावे, ही भूमिका होती. परंतू आता चंद्रपूरात भाजपाला पाठिंबा दिल्यामूळे, ६ नगरसेवकांवर कारवाई होणार आहे, असे ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे.





