गोंदिया – जिल्ह्यात उपचाराच्या नावाखाली लहान बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. गोंदियात उपचाराच्या नावाखाली १० दिवसांच्या बालिकेची ३ लाखांत विक्री करण्यात आली आहे. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार गोंदियाचा डॉक्टर पळून गेला आहे. गोंदिया जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. गोंदियातील एका डॉक्टरने एका १० दिवसांच्या लहान बाळाला ३ लाख रुपयांना विकल्याची घटना उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी ही घटना आहे. डॉक्टरने एका १० दिवसांच्या बाळाला ३ लाख रुपयांना विकले आहे.
या प्रकरणात गोंदियातील मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे. भंडाऱा जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे १० दिवसांचे बाळ असल्याची माहिती मिळाली होती. अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता, संबंधित महिलेने बाळाला घेऊन पळ काढला आहे. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले आहे. आणि तपासाचे धागेदोरे गोंदियातील बालाजी हॉस्पिटलपर्यंत पोहोचले आहेत. जिल्ह्यात बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये आणखी बरेच जण असू शकतात अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.
पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, ३ लाखांपैकी १ लाख रुपये रोख आणि १ लाखाचा धनादेश डॉक्टर व मध्यस्थी असलेल्या महिलेच्या खात्यात जमा झाला होता. बाकी १ लाख रुपये ५ फेब्रुवारी २०२६ ला दिले जाणार होते. या घटनेने संपूर्ण विदर्भात खळबळ उडाली आहे. लोकांच्या गरिबीचा फायदा घेऊन अशा प्रकारे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बाळाची विक्री करणार्या रॅकेटचा पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे, तर मुख्य सूत्रधार आणि या गुन्ह्यांतील इतर 3 आरोपी पळून गेले आहेत. गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये एका परिवाराने आपल्या १० दिवसांच्या मुलीला उपचारासाठी दाखल केले होते.
डॉ. नितेश बाजपेयी याने उपचाराचा खर्च खूप जास्त होईल, अशी भीती पालकांना घातली होती. नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत आम्ही मुलीवर मोफत उपचार करू, अशी खोटा बहाणा करून डॉक्टरने पालकांकडून मुलीला आपल्या ताब्यात घेतले होते. मात्र, उपचाराऐवजी या गोंदियातील डॉक्टरने भंडाऱा जिल्ह्यातील पांढराबोडी येथील एका महिलेला या लहान बाळाची 3 लाख रुपयांत विक्री केली आहे. या प्रकरणात भंडारा पोलिसांची पथके डॉक्टरचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेने राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील लहान बाळाची विक्री करणारे रॅकेट सापडले आहे. याप्रकरणात अधिक तपास भंडारा पोलिस करत आहेत.





