एआय फक्त एका वर्षात ९९ टक्के नोकऱ्या हिरावून घेईल, फक्त ‘या’ नोकऱ्याच राहतील, तज्ञांचा इशारा

SHARE:

नवी दिल्ली – भारतात आधीच नौकर्यांचा दुष्काळ आहे, त्यातही सरकारी आणि खाजगी क्षेत्रात नव नवीन तंत्रज्ञान लागू करत आहे. दरम्यान आता भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) चा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. एआय आपली जागा कधी घेईल याची अनेकदा चर्चा होते. पुढील पाच वर्षांत कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम स्वयंचलित होऊ शकतात. प्रसिद्ध आर्टिफिशियल इंटेलिजेंस संशोधक डॉ. रोमन याम्पोल्स्की यांनी हा इशारा दिला आहे.

डॉ. रोमन याम्पोल्स्की म्हणतात की एआयच्या आगमनाचा या दशकात रोजगारावर लक्षणीय परिणाम होईल. त्यांनी एक धक्कादायक इशारा दिला की एआय फक्त एका वर्षात 99 टक्के मानवी नोकऱ्या हिरावून घेईल. रोमन असेही म्हणतात की असे कोणतेही मानवी काम दृष्टीस पडत नाही जे स्वयंचलित केले जाऊ शकत नाही.

याम्पोल्स्की म्हणतात की २०४५ पर्यंत जग अशा तांत्रिक टप्प्यावर पोहोचू शकते जिथून परतणे अशक्य होईल. त्यांनी कृत्रिम सामान्य बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि इतर तंत्रज्ञानावर सविस्तरपणे सांगितले. ते म्हणाले कि येणारे बदल मागील औद्योगिक परिवर्तनांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतील.

डॉ. याम्पोल्स्की हे संगणक शास्त्रज्ञ असून उत्तर युरोपमधील बाल्टिक देश असलेल्या लाटवियाचे नागरिक आहेत. सध्या, याम्पोल्स्की लुईव्हिल विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी एआय सुरक्षा आणि जोखीम यावर १०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.

टीओआयच्या एका वृत्तानुसार, डॉ. याम्पोल्स्की यांनी सांगितले की कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम पाच वर्षांत स्वयंचलित केले जाऊ शकतात. त्यांनी जोडले की मोठ्या प्रमाणात बेरोजगारी जवळ येत आहे. त्यांनी सांगितले की मी १० टक्के बेरोजगारीबद्दल बोलत नाही तर ९९ टक्के बेरोजगारीबद्दल बोलत आहे.
नोकरी टिकवून ठेवण्याबद्दल बोलताना याम्पोल्स्की म्हणाले की तुमच्याकडे फक्त अशा नोकऱ्या असतील जिथे, कोणत्याही कारणास्तव, तुमच्या जागी दुसर्या कोणातही व्यक्तीने काम करावे, असे वाटेल. त्यांनी जोडले की काही नोकऱ्यांसाठी माणसाची आवश्यकता असते. ते म्हणाले की हे शक्य आहे की एखाद्याला काही कारणास्तव मानवी लेखापाल ठेवायचा असेल.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की यावेळी परिस्थिती वेगळी असेल, कारण मागील तांत्रिक क्रांतींमध्ये, यंत्रे मानवांसाठी साधने म्हणून काम करत होती, परंतु एआय मानवांची जागा स्वतः घेऊ शकेल. त्यांच्या मते, असे कोणतेही काम शिल्लक राहणार नाही जे स्वयंचलित केले जाऊ शकत नाही. कंटेंट निर्मिती, मीडिया आणि पॉडकास्टिंग सारखी कामे देखील मशीनद्वारे अधिक वेगाने आणि अचूकतेने केली जातील.

Leave a Comment

अधिक वाचा