पुणे – पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात न्यायालयाकडून ६ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहेत. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठा निर्णय झाला आहे. तर याप्रकरणातील ६ आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तर खटल्याची सुनावणी लवकर सुरु होणार आहे. राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात प्रकरणात सत्र न्यायालयाने ६ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. या आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले असून, खटल्याची सुनावणी येत्या २३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. त्यामुळे या पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी १४ जुलै २०२५ रोजी ११ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, २ मुले, १ मुलगी आणि इतर ६ जणांचा समावेश होता. पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर ५८ दिवसांनी हे आरोपपत्र दाखल झाले होते. आता सत्र न्यायालयाने ६ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह १६ मे २०२५ रोजी भुकूम येथील सासरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
मात्र शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. आत्महत्या की खून याबाबत संशय निर्माण झाला होता. या प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. हगवणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले होते. मग तपासाची सूत्र वेगाने हलू लागली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक हागवणे, सासू लता हागवणे, नणंद करिश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दीर सुशील हागवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली आहे.
हगवणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावरही टीका झाली होती. निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवून धमकावल्याचा अतिरिक्त आरोपही ठेवण्यात आला आहे. १७ मे २०२५ रोजी वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुण्यामध्ये हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर २०२५ च्या जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. पूणे पोलिसांनी या प्रकरणात हगवणे परिवार व मित्र परिवारातील काही लोकांना अटक केली आहे.
पुण्यातील या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटक केलेल्या सर्वांवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ व मारहाण, गुन्हेगारी कट रचणे तसेच पुरावे नष्ट केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता न्यायालयाने ६ आरोपींवर आरोप निश्चित केल्याने या प्रकरणाच्या सुनावणीला वेग येणार आहे. या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात २३ फेब्रुवारी २०२६ पासून सुनावणी सुरू होणार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.




