मुंबई – देशात आता वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे नियम कडक होणार आहेत, तर चाचणीचे व्हिडीओ रिकॉर्डिंग करण्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आदेश दिले आहेत. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामूळे अचानक देशातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवारांच्या विमानाचा २८ जानेवारी रोजी अपघात झाला होता. त्यानंतर आता डीजीसीएने नवे नियम लागू केले आहेत. हे नियम वैमानिकांबरोबरच कॅबिन क्रूसाठी बंधनकारक आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एका महत्त्वाच्या नियमामध्ये बदल केला आहे.
यासंदर्भातील आदेश नुकतेच लागू करण्यात आले आहेत. डीजीसीएने वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे नियम अधिक कठोर केले आहेत. तर या वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे व्हिडीओ रिकॉर्डिंग करण्याचे आदेश देशातील सर्व यंत्रणांना दिले आहेत. तसेच, हे व्हिडीओ रेकॉर्डिंग किमान ६ महिने जतन करून ठेवण्याचे आदेशही डीजीसीएने दिले आहेत. या नव्या नियामंमुळे विमान प्रवास अधिक सुरक्षित होईल असे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्या अपघतानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा २८ जानेवारी रोजी अपघात झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती.
अजित पवार व इतर लोकांचा बारामती विमानतळावजळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या अपघातासंदर्भात अनेक शंका व प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांनी अगदी वैमानिकाने मद्यप्राशन केले होते का? त्याची मद्यप्राशन चाचणी झाली का? चाचणी झाली असेल तर त्याचं फुटेज कुठे आहे? असे प्रश्न उपस्थित केले होते. याच पार्श्वभूमीवर आता डीजीसीएने वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे नियम कडक केले आहेत. सध्याच्या नियमावलीनुसार वैमानिक व केबिन कर्मचारी विमानात चढण्यापूर्वी तसेच विमान उड्डाण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मद्यप्राशन चाचणी करण्यात येते.
आता २४ तासांच्या आत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. या मद्यप्राशन चाचणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करतानाच जर वैमानिकाने मद्यप्राशन केल्याचे आढळल्यास किंवा ही चाचणी वैमानिक अथवा केबिन कर्मचारी पास करू शकला नाही तर त्याचा अहवाल २४ तासांच्या आत सादर केला जाणार आहे. वैमानिक मद्यप्राशन चाचणीमध्ये सकारात्मक आढळून आला तर त्याच्यावर कोणती कारवाई करायची यासंदर्भात नव्या आदेशात उल्लेख केला आहे. वैमानिक वा केबिन कर्मचाऱ्याला आर्थिक दंड लावणे, त्याचे समुपदेशन करणे ते त्याचे निलंबन अशा शिक्षेच्या पातळ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
आपल्या ड्यूटीच्या आधी १२ तास वैमानिकाने मद्यप्राशन करू नये, असे आदेश दिले आहेत. इंडिगोमध्ये लवकरच हजार वैमानिकांची भरती करण्यात येणार आहे. डीजीसीएने वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी वेळापत्रक जारी केले आहे. यामुळे मनुष्यबळाअभावी विमान सेवेला फटका बसू नये, याकरिता इंडिगो कंपनीने १ हजार वैमानिकांच्या भरतीचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षणार्थी वैमानिक, वरिष्ठ फर्स्ट ऑफिसर आणि कॅप्टन ही पदे भरली जाणार आहेत. कंपनीच्या ताफ्यात विमानांची संख्या जास्त आहे. त्यामूळे आता नवीन भरती करण्यात येणार आहे, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हटले आहे.




