मुंबईतील मुलुंड अपघात प्रकरणात कंपनीला ५ कोटींचा दंड, ५ अधिकाऱ्यांना अटक व कंपनीवर गुन्हा दाखल

SHARE:

मुंबई – मुलुंड अपघात प्रकरणात कंपनीला ५ कोटींचा दंड केला आहे, तर ५ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे व बांधकाम कंपनीवर गुन्हा दाखल केलाआहे. आता मुलुंड अपघात प्रकरणात कडक कारवाई करण्यात आली आहे. मूलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने मुंबई फिरायला आलेल्या उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. मुलुंड प्रकरणात कंपनीला ५ कोटींचा दंड केला आहे, तर इंजिनिअरला निलंबित करण्यात आले आहे, याप्रकरणात आणखी दोषींवर कडक कारवाईचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मुंबईत मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब पडून झालेल्या अपघात प्रकरणात आता कारवाईला वेग आला आहे.आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

तसेच मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्तालदी कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्ट्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायझर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात कंपनीला पाच कोटींचा दंड केला आहे. अवधुत इनामदार हे डीबी हिल एलबीजी कंपनीशी सबंधित आहेत. मुलुंड दुर्घटनेला जबाबदार असलेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सत्यजीत साळवे यांना निलिंबत करण्यात आले आहे. तसे आदेश उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहे. मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावं असे आदेश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मेट्रो मार्गाचे बांधकाम करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला १  कोटींचा दंड तर अपघाताला जबाबदार असणाऱ्या मिलन इंफ्रा कंपनीला ५  कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर एमएमआरडीएकडून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना १५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईमध्ये मुलुंडमध्ये एलबीएस रोडवर वडाळा ते कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण जखमी झाले आहेत. तसेच ३  वाहने स्लॅबखाली दबली गेली आहेत. रामधन यादव असे मृत व्यक्तीचे नाव असून ते उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. मुंबई फिरण्यासाठी आले असता त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या काम चालू असताना हा स्लॅब कोसळला आहे. एलबीएस रोडवरून ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक या अपघातानंतर काही तास बंद करण्यात आली होती. एमएमआरडीए या संपूर्ण मेट्रो मार्गाचं बांधकाम करत आहे. मेट्राच्यो वेगवेगळ्या टप्प्यांचे ४ वेगवेगळे कंत्राटदार आहेत.

ज्या भागात हा अपघात झाला तिथले बांधकाम टाटा प्रोजेक्टस लिमिटेड आणि चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनीकडे आहे. या अपघातानंतर बंद करण्यात आलेला एलबीएस मार्ग ८  तासांनी पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. आहे. या प्रकरणात ५  जणांना अटक करण्यात आली आहे. मुलुंड पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात मुंबई फिरायला आलेल्या उत्तरप्रदेशातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मुंबई फिरण्यासाठी आलेले उत्तर प्रदेशातील रामधन यादव यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

रामधन यादव हे उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील एका गावाचे सरपंच म्हणून काम पाहत होते. ते मित्रासोबत मुंबई फिरण्यासाठी आले होते. कळव्यात एका लग्नासाठी रामधन यादव आणि महेंद्र यादव रिक्षाने निघाले होते. त्याचवेळी मेट्रोचा सिमेंट ब्लॉक रिक्षावर कोसळला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई फिरल्यानंतर २ दिवसात रामधनी यादव उत्तर प्रदेशात जाणार होते. मुंबईतील या मुलूंड अपघात प्रकरणात राज्य सरकारने सर्व दोषी आरोपींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा