संभाजीनगर – सिडको मध्ये मोठ्या कंपनीच्या गुंतवणुकीच्या नावाखाली एका तरुणाची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे, तर याप्रकरणात २ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगरमध्ये मोठ्या कंपन्यांचे इव्हेंट सांगून १७.५१ लाख एका तरूणाकडून घेतले आहेत. तर संभाजीनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संभाजीनगरमध्ये लवकरात लवकर पैसे कमावण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची लाखों रूपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा प्रकार घडला आहे. संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. जलद फायदा मिळेल आणि व्यवसायात भागीदार होता येईल, अशा गोड बोलण्याला भुलून एका तरुणाने आपली बचत केलेली रक्कम आरोपींकडे दिली आहे.
सुरुवातीला सर्व काही विश्वास वाटत असल्याने त्याने वेळोवेळी रक्कम दिली आहे. मात्र काही महिन्यांनी व्यवहारात संशय निर्माण झाला आहे. पैसे परत मागितल्यावर टाळाटाळ सुरू झाली आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संभाजीनगरमधीले पोलिसांकडे धाव घेतली आहे. संभाजीनगरमधील या घटनेमुळे गुंतवणूक करताना काळजी घेण्याची गरज आहे. संभाजीनगरमधील सिडको परिसरात राहणार्या तरुणाची ओळख आरोपी संजना देविदास चौधरी हिच्याशी तिच्या भावामार्फत झाली होती. संजना चौधरी आणि तिचा भाऊ सुयश देविदास चौधरी यांनी आपण इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करत असल्याचे सांगितले.
मोठ्या कंपन्यांचे कार्यक्रम आपल्या मार्फत आयोजित केले जातात, आणि व्यवसाय विस्तारासाठी गुंतवणूकदारांची गरज आहे, असे त्यांनी सांगून त्यांनी तरुणाचा विश्वासघात केला आहे. या दोन आरोपींनी गुंतवणुकीच्या नावाखाली संभाजीनगरमधील तरूणांकडून लाखो रूपयांची रक्कम घेतली आहे. आरोपींनी सुरुवातीला कमी रकमेची मागणी करून व्यवहार सुरू केला. नंतर मोठ्या नफ्याचे आश्वासन देत टप्प्याटप्प्याने अधिक पैसे घेण्यात आले आहेत. बनावट कागदपत्रे आणि कामाचे फोटो दाखवून व्यवहार खरे असल्याचे भासवण्यात आले आहे. अशा प्रकारे आरोपी असलेल्या बहीण-भावाने संभाजीनगरमधील तरूणाकडून एकूण १७ लाख ५१ हजार रुपये घेतले आहेत.
काही काळानंतर रक्कम परत मिळाली नाही, तसेच संपर्क केला तर दोन्ही आरोपींनी टाळण्यास सुरुवात केल्याने तरूणाला फसवणुक झाल्याचे लक्षात आले आहे. पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात येताच तरुणाने संभाजीनगरमधील सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार संजना देविदास चौधरी आणि सुयश देविदास चौधरी या दोन आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.
संभाजीनगरमधील व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. राज्यात अलीकडच्या काळामध्ये मोठ्या फायद्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून मोठी रक्कम देण्यापूर्वी कागदपत्रांची खातरजमा करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची अधिकृत नोंदणी, करारपत्र आणि व्यवहाराची लेखी नोंद नसल्यास गुंतवणूक टाळावी, असा सल्ला राज्यांतील पोलिसांकडून देण्यात येत आहे. संभाजीनगरमध्ये लवकरात लवकर फायदा मिळेल, जास्त पैसा मिळेल असे सांगून दोन आरोपींनी एका तरूणाची लाखो रूपयांची फसवणूक केली आहे.




