धाराशिव – कळंब येथे जिल्हा परिषद निवडणुकीवरून काँग्रेस व ठाकरेगट शिवसेनेच्या कार्यकर्त्यात हाणामारी झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादावरून काँग्रेस व ठाकरेगटाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये भर चौकात सिनेस्टाईल मारामारी झाली आहे. धाराशिवमधील कळंब शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादावरून धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात राजकीय वातावरण तापले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतील डीकसळ गटाच्या वादातून हा संघर्ष झाला आहे. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आहे. पोलिसांची उपस्थिती असतानाही दोन्ही गटांतील कार्यकर्ते हाणामारी करत होते. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. धाराशिवमध्ये झालेल्या या मारहाणीत दोन्ही गटांतील एकूण ६ कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार यांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोरच घडलेल्या या घटनेनंतरही अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही हिंसक घटना घडली आहे. धाराशिवमधील कळंब शहरातील राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आहे.




