आमदार अब्दुल सत्तारांनी शिव मंदिराचं घेतलं दर्शन, तरुणांनी गोमूत्र शिंपडून केलं शुद्धीकरण

SHARE:

मुंबई – शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी गोमूत्र शिंपडून मंदिराचे शुद्धिकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या घटनेनंतर राजकीय पारा देखील तापला आहे. भाजपने आमदार अब्दुल सत्तार यांनी मंदिरात दर्शन घेतल्यावरून जोरदार टीका केली आहे. तर भाजपच्या याच टीकेवर शिवसेना उबाठाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमार अब्दुल सत्तार यांनी रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिरात महाशिवरात्र निमित्ताने दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर काही तरुणांनी सत्तारांच्या याच दर्शनावरून आक्षेप घेतला.

महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात प्रवेश देण्याला विरोध करत काही तरुणांनी गोमित्र शिंपडून मंदिराचं शुद्धिकरण केलं. यामुळे आता नवा वाद सुरू झाला असून स्थानिक तरूणांनी सत्तार हे रोज मांसाहार करून घराबाहेर पडतात. त्यामुळे त्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका केली आहे.

दुसरीकडे भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी देखील या घटनेचं समर्थन केलं आहे. भोसले म्हणाले कि अब्दुल सत्तार हे हिंदू नाहीत. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला नसेल तर मंदिराच्या गर्भगृहात जाणे योग्य नाही. धार्मिक नियम पाळले गेले पाहिजेत. सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का? नसेल केला तर त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला पाहिजे होतं. आमच्या देवी देवतांची मंदिरं काही स्मारकं नाहीत, असं भोसले म्हणाले.
तुषार भोसले यांच्या टीकेवरून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार पलटवार केला. ते म्हणाले कि मंदिर असो, मशीद असो, हे सर्व सार्वजनिक ठिकाणे आहे. तुषार कोण शंकराचार्य लागून गेला आहे का, हराम.. तो सांगणारा. एखादा मुस्लीम माणूस मंदिरात जाऊन दर्शन करत असेल, तर त्याचे स्वागत करावे का त्याला विरोध करावा? असा सवाल दानवेंनी तुषार भोसले यांना केला.

आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी देखील यावर टीका केली आहे. सत्तार यांनी मंदिराला दोन कोटींची देणगी दिली होती. ते काम तेवढ्यात पूर्ण झाले नाही म्हणून काही लोकांनी पाहणी करायला बोलावलं होतं, म्हणून सत्तार गेले होते मात्र, काही संकुचित बुद्धीचे लोक यावर राजकारण करत असल्याची टीका आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा