ठाणे – भिवंडी महापालिकेत महापौरपदावरून भाजप ९ नगरसेवकांतच फूट पडली आहे. भिवंडीत महापालिकेत भाजपचे नगरसेवक फुटले आहेत. महापौरपदावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे. ऐनवेळी भाजपाने महापौर पदाचा उमेदवार बदलला आहे. भाजपचे भिवंडी शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी महापौर पदाच्या उमेदवार म्हणून स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. भिवंडी महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाने आपला उमेदवार बदलला आहे. त्यानंतर, भाजपामध्ये अंतर्गत वादातून दोन राजकीय गट पडल्याने आता भिवंडी महापालिकेत महापौर कोण होणार? यावरून वाद सूरू झाला आहे.
भाजपाने यापूर्वी नारायण चौधरी यांना भाजपच्या महापौरपदाचे अधिकृत उमेदवार घोषित केले होते. नारायण चौधरी यांनी भाजपकडून महापौर पदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण लागले आहे. भाजपने ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलला आहे. त्यामुळे, भाजपा नगरसेवकांतच फूट पडल्याचे चित्र भिवंडीत पाहायला मिळाले आहे. भिवंडी महापालिकेत भाजपाचे ९ नगरसेवक फुटल्याची माहिती मिळाली आहे. भाजपाचे भिवंडी शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी महापौर पदाच्या उमेदवार म्हणून स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे.
त्यासंदर्भातील लेखी पत्र भाजप शहराध्यक्षांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना दिले. तर, भाजपने आता स्नेहा मेहुल पाटील यांची महापौरपदाची अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आह.े अशी भाजपा शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे, भाजपाचे नारायण चौधरी नाराज झाले असून त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मला भाजपाने महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला होता. मात्र, महायुतीतील घटक पक्ष सोबत यायला तयार नव्हते, त्यांच्याशी अनेकवेळा मिटींग केल्या आहेत. मात्र घटक पक्ष सोबत येत नाही. त्यातच भाजपाने स्नेहा मेहुल पाटील यांना महापौरपदाचे उमेदवार घोषित केले आहे. त्यामुळे मी सेक्युलर सोबत जाणार, अशी प्रतिक्रिया नारायण चौधरी यांनी दिली होती.
त्यानंतर, ते काँग्रेससोबत गेल्याने भिवंडी महापालिकेत चांगलंच सत्तेसाठी मोठे राजकारण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. भिवंडीतमध्ये भाजपाच्या नगरसेवकांमध्ये फाटाफूट झाली आहे. भाजपाचा एक गट नारायण चौधरींच्या विरोधात गेला आहे. नारायण चौधरी काँग्रेससोबत गेल्याने भाजपाचा एक गट नाराज झाल्याची माहिती मिळाली आहे. नारायण चौधरी हे भाजपचे अधिकृत महापौरपदाचे उमेदवार तर स्नेहा पाटील ह्या डमी उमेदवार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तर भिवंडीत भाजपा नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचे दिसून आले आहे. तसेच, नारायण चौधरी हे काँग्रेससोबत गेल्याने भाजपाचे नगरसेवक नाराज झाले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीकडे मिळून ३४ नगरसेवक आहेत. बहुमतासाठी त्यांना कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी आणि समाजवादी पक्षाच्या मदतीची आवश्यकता आहे. हे सर्व घटक एकत्र आल्यास महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते. मात्र, महायुतीतही महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद झाला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत.




