लखनऊ विद्यापीठात मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला तीव्र विरोध, ‘मोहन भागवत गो बॅक’, आरएसएस मुर्दाबाद’ च्या दिल्या घोषणा

SHARE:

लखनऊ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि या संघटनेची राजकीय शाखा भाजपने गेल्या काही वर्षांत देशभरात जे द्वेषाचं वातारवण निर्माण केलं त्यातून आता एससी, एसटी आणि ओबीसींचे लोक जागृत होत आहेत आणि आरएसएस आणि भाजपने निर्माण केलेल्या द्वेषाचा सामना आता त्यांना करावा लागत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या लखनऊ विद्यापीठातील कार्यक्रमाला बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला. इतकेच नाही तर ‘मोहन भागवत गो बॅक’ आणि आरएसएस मुर्दाबाद, अशा घोषणाही विद्यार्थ्यांनी दिल्या.

बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या लखनऊ विद्यापीठाच्या मालवीय हॉलमध्ये ‘आरएसएस रिसर्च स्कॉलर्स डायलॉग’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामुळे कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना चार तास गैरसोयीचा सामना करावा लागला. अनेक विद्यार्थी त्यांच्या विभागात पोहोचू शकले नाहीत. विद्यार्थी कॅशियरच्या कार्यालयातून पदवी, स्थलांतर प्रमाणपत्रे आणि नोंदणी फॉर्म घेऊ शकले नाहीत.

विद्यापीठाचे मुख्य गेट आणि बहुतेक मानव्यशास्त्र विभागांकडे जाणारे गेट क्रमांक २  बंद करण्यात आले. कॅनिंग कॉलेज इमारत आणि मुख्य इमारतीकडे जाणारे रस्ते देखील सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले होते. प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्व, हिंदी, राज्यशास्त्र, पाश्चात्य इतिहास आणि शिक्षण विभागातील विद्यार्थी सुरक्षा बॅरिकेड्सजवळ उभे होते. टीओआयसी बोलताना, एक विद्यार्थिनी म्हणाली की ती सकाळी ९:३० च्या सुमारास प्रवेश अर्ज घेण्यासाठी आली होती, परंतु गेट क्रमांक १  आणि २  मधून तिला प्रवेश दिला नाही. आम्हाला दुपारी १२ नंतरच आत प्रवेश देण्यात आला.
दरम्यान, समाजवादी छात्र सभा आणि इतर विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचा कडाडून विरोध केला. या दरम्यान सुमारे २५ विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये ‘मोहन भागवत गो बॅक’ आणि आरएसएस मुर्दाबाद, अशा घोषणा दिल्या. ‘मोहन भागवत भारतीय समाजातील द्वेषाचे प्रतीक’ आहेत, अशी टीका केली. विद्यापीठ प्रशासन विरोधी विद्यार्थी संघटनांना शैक्षणिक कार्यक्रमांसाठी हॉल देत नाही, तर सत्ताधारी विचारसरणीशी संबंधित कार्यक्रमांना परवानगी देते, असा गंभीर आरोपही केला.

विद्यापीठ करदात्यांच्या निधीतून चालवले जाते आणि खाजगी वैचारिक पदांसाठी मंच म्हणून वापरले जाऊ नये, असेही विद्यार्थी नेते म्हणाले. निषेधादरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर केला आणि काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले, नंतर त्यांना सोडण्यात आले. एससी, एसटी, ओबीसींना जातीय भेदभावापासून संरक्षण देण्यासाठी प्रस्तावित यूजीसी नियमांवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भागवत यांचा हा दौरा आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 29 जानेवारी रोजी या नियमांना स्थगिती दिली होती.

लखनऊच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले भागवत यांनी मंगळवारी संध्याकाळी लखनऊ मधील सरस्वती शिशु मंदिरात एका कार्यक्रमात सांगितले की हिंदू कुटुंबांना किमान तीन मुले असली पाहिजेत. तीनपेक्षा कमी मुले असलेला समाज कालांतराने कमकुवत होतो. भागवत म्हणाले आम्हाला कोणाकडूनही धोका नाही, परंतु आपण सतर्क राहिले पाहिजे. त्यांनी ही भीती वक्त करण्याचे कारण म्हणजे एससी, एसटी आणि ओबीसींमध्ये आता मोठ्या प्रमाणात जागृती येत आहे. तसेचे २२ फेबु्रवारी रोजी नागपूर येथील आरएसएस मुख्यालयाला भारत मुक्ती मोर्चांसह विविध संटनांकडून घेराव घालण्यात येणार आहे. त्यामुळेच भागवत यांनी ही भीती व्यक्त केली असावी, अशी चर्चा देशभरात रंगली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा