आजचा गुरूवार, दि. २६ फेब्रुवारी २०२६ ! श्री गणेशाची कृपा कोणावर होणार, आजचे राशीभविष्य वाचा…

SHARE:

राशीभविष्य – आज २६ फेब्रुवारी २०२६ , आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्री गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज समस्या या काही वेळेस संधीही असू शकतात हे लक्षात ठेवा, तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्न यांना जिद्दीचे पंख द्या.

वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज महिला लहरी बनतील, हाता तोंडाशी आलेल्या कामांमध्ये यश मिळाले तरी, त्याचे समाधान मात्र न मिळाल्यामुळे मानसिक त्रास संभवतो.

मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज मित्र मंडळींचे सहकार्य मिळेल, मोठ्या भावांशी थोडे मतभेद होऊ शकतात.

कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रत्येकाकडे काही चांगले गुण असतात, हे हेरून गुणग्राहकता ठेवली, तर तुमच्या फायद्याचे आहे.

सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज समज-गैरसमज यांच्या गाठी सोडून टाकल्या, तर मानसिक समाधान मिळेल, निसर्गाच्या सानिध्यात गेलात तर एकदम फ्रेश होऊन जाल.

कन्या रास (Virgo)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज उपासकांना अध्यात्माचा मार्ग स्पष्ट दिसेल, त्यासाठी ते प्रयत्न करतील.

तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याला स्मरून प्रथम अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, महिलांनी दिलेल्या शब्दाला जागावे.

वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज सत्य जसे आहे तसेच पुढे येते, त्यामुळे कोणत्याही मोहपाशात न अडकता ईश्वराला स्मरून काम करा.

धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज व्यवसायात इतरांशी स्पर्धा करण्यामध्ये सरशी राहील, पुढे मिळणाऱ्या पैशाची बीजे आज रोवली जातील.

मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज कुटुंबात मंगल कार्यात हजेरी लावावी लागेल, विद्यार्थ्यांना पूर्वीच्या अभ्यास पद्धतीत बदल करावासा वाटेल.

कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज नवीन बदलाला सामोरे जाताना थोडा वेळ अवश्य जाईल, परंतु प्रयत्न मात्र सोडू नका.

मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज नवीन नोकरी शोधायची आहे, त्यांनी अवश्य विचार करायला हरकत नाही, वाहने जपून चालवावीत.

 

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Leave a Comment

अधिक वाचा

नागपुरात एका NGO मध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका व्यक्तीने महिलेच्या कपाळावर किस करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत!