संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रावर शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार उघड; संस्थाचालक व नागरिकांनी दिला चोप

SHARE:

संभाजीनगर – परीक्षा केंद्रावर शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार उघड झाला आहे. संभाजीनगरमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीशी शिक्षकाने गैरवर्तन केले आहे. शिक्षकाला नातेवाईकांसह संस्था चालकाकडून मार देण्यात आला आहे. संभाजीनगरमध्ये परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीशी शिक्षकाने गैरवर्तन करून तिचा मोबाईल क्रमांक घेतला होता. तसेच वारंवार शिक्षक विद्यार्थिनीला फोन करून त्रास देत होता, असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी शिक्षकांवर केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या १० वी व १२ वी बोर्ड परीक्षा सूरू आहेत. या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून संबंधित शिक्षकाला विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसह संस्था चालकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा शिक्षक परीक्षा केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त केला होता. घडलेला प्रकार विद्यार्थिनीने घरातील व्यक्तींना सांगितला होता. त्यानंतर नातेवाईकांनी संस्था चालकासमोर संबंधित शिक्षकाला बोलावले. त्यावेळी त्याने चूक झाल्याचे कबूल केले होते. यानंतर संतप्त नातेवाईकांनी त्याला चोप दिला. संबंधित शिक्षकाने माफी मागितल्याचीही माहिती समोर आली आहे. या शिक्षकाने इतर विद्यार्थिनींनाही त्रास दिला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर संबंधित शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती संस्था चालकांनी दिली आहे.

या घटनेनंतर परीक्षा केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. संबंधित विद्यार्थिनीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, इतर विद्यार्थिनींकडूनही माहिती घेतली जात आहे. या शिक्षकांच्या गैरवर्तनाच्या आरोपांची सखोल चौकशी केली करण्यात येणार आहे, असे संभाजीनगर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

संभाजीनगरमधील शिक्षणसंस्थेने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली आहे. या अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा आणि शिस्तीबाबत अधिक दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिक्षा केंद्रावर येणार्या विद्यार्थ्यीनींच्या सुरक्षिततेशी काळजी घेतली जाईल असे त्या संभाजीनगरमधील शिक्षण संस्थेकडून सांगण्यात आले आहे. या घटनेत कोणी दोषी सापडल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे संभाजीनगरमधील संस्थाचालक म्हणाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा