राशीभविष्य – आज १ मार्च २०२६, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
आज वाहने जपून चालवावी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल शिवाय व्यवसायामध्ये पार्टनरशिप पटवून घ्यावे लागेल.
वृषभ रास (Taurus)
तुमच्यातील चांगुलपणाला लोक दात देतील वाईट यातून चांगले घेण्याची गुण ग्राहकता ठेवाल.
मिथुन रास (Gemini)
महिलांना मानसिक अस्थिरता जाणवेल नोकरी व्यवसायात काही भरीव बदल करायचे मनात येईल.
कर्क रास (Cancer)
एखाद्या गोष्टीचे निरीक्षण परीक्षण फार चांगल्या पद्धतीने कराल याचा उपयोग तुम्हाला निश्चित होईल.
सिंह रास (Leo)
भरपूर कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल परंतु त्याचे फळही मिळेल.
कन्या रास (Virgo)
कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील घरामध्ये दुरुस्तीचे काम निघेल त्यासाठी पैशाची तजवीज करावी लागेल.
तूळ रास (Libra)
प्रेम प्रकरणांमध्ये जोडीदाराच्या मनासारखे वागण्याचा आटापिटा करावा लागेल तरी सुद्धा मानसिक समाधान मिळणार नाही.
वृश्चिक रास (Scorpio)
कुटुंबामध्ये नेहमीपेक्षा वातावरण जरा नरम गरम गरमच राहील त्यामुळे महिलांना सामोपचाराचे धोरण स्वीकारणे भाग पडेल.
धनु रास (Sagittarius)
आज जशी संधी मिळेल तसे वागण्याचा प्रयत्न राहील काही वेळेस द्विधा मनस्थिती पण होऊ शकते.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज कलात्मक काम करणाऱ्यांना अनेक संधी मिळतील, महिलांना आपले छंद जोपासता येतील.
कुंभ रास (Aquarius)
आज कृती ऐवजी वैचारिक गोंधळ फार होतील त्यामुळे चांगली बुद्धी असूनही केवळ या गोष्टीमुळे तुम्ही मागे पडण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces)
जोडीदाराला समजून घेतले तरी त्याच्या मनाचा थांग पत्ता लागणार नाही, विद्यार्थी मुडी बनतील.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)



