नाशिक – पिण्याच्या पाण्यामध्ये मृत कबुतर सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून नाशिक महापालिकेत तणाव निर्माण झाला. नाशिकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार झाला आहे. नाशिक महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामूळे नागरिकांच्या पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मृत कबुतर सापडले आहे. या धक्कादायक घटनेमूळे नाशिक महापालिका सभागृहात नगरसेवकांचा वाद झाला आहे. नाशिक महानगर पालिकेत पाणी प्रश्नावर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पाण्याच्या प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला होता. नाशिकमध्ये पाणी प्रश्नावर महापालिका सभागृहात सभेत वाद झाला आहे.
मात्र पाण्याच्या प्रश्नावरून महापालिकेत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये बराच काळ गोंधळ झाला आहे. नाशिकमधील महानगरपालिकेतील नगरसेविकांनी सभागृहात आंदोलन केले आहे. त्या थेट पाण्याचा हंडा घेऊन सभागृहात पोहोचल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागात पाणी नसल्याने नगरसेविका आक्रमक झाल्या होत्या. नाशिककरांच्या जीवाशी खेळ करण्याचा नाशिक महापालिका प्रशसनाचा हा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील जलवाहिनीत मेलेले कबूतर सापडल्याचे काही फोटो सभागृहात दाखवण्यात आले होते. नाशिक मनपाच्या सातपूरच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये हा धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी नाशिक महापालिकेतील नगरसेवक विश्वास नांगरे आणि माधुरी बोलकर आक्रमक झाले होते. त्यांनी नाशिकमधील नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळ थांबवविण्याची मागणी केली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि शहरातील रस्त्यांवरील खड्डयांवरून नगरसेवक आक्रमक झाले होते. यावेळी नाशिकमधील सातपूरच्या प्रभाग १० मधील एका जलकुंभात मृत कबूतर सापडल्याचा आरोप नाशिक महापालिकेच्या सभागृहात स्थानिक नगरसेवकांनी केला होता.
या वेळी त्यांनी नाशिकच्या महापौरांना पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन मधून काढलेल्या मृत कबुतराचा फोटो दाखवला, आणि संबंधित दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. नाशिक महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या या कारभारावरून नाशिकच्या नगरसेवकांनी महापालिका प्रशासनावर टीका केली आहे. या दूषित पाण्यामुळे नाशिक महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. हा नाशिकमधील नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचा प्रकार आहे, अशी भावना नाशिकमधील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.




