बेंगलोर – कर्नाटक राज्यामध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री सिद्दरामैय्या म्हणाले आहेत. भारत सरकारच्या नव्या आदेशानुसार कर्नाटक राज्यात १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याची घोषणा कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात अनेक कडक नियम करण्यात आले आहेत. आता भारत देशात सुद्धा सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यास हळु हळु सुरूवात होत आहे.
कारण, भारत देशात १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापराकडे दुर्लक्ष झाले होते, परंतू आता कर्नाटक राज्याने सोशल मीडिया वापरण्यासाठी १६ वर्षाच्या खालील लहान मूलांसाठी बंदी घातली आहे. कर्नाटक राज्यातील सरकारने नवा आदेश काढला आहे. त्यासंदर्भात तसा ठराव पास करण्यात आला आहे. भारत देशात 16 वर्षांखालील लहान मुले सोशल मीडियाचा वापर जास्त करत आहेत, व गैरप्रकार रोखण्यासाठी व लहान मूलांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून कर्नाटक सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.
मोबाईलच्या वापरामूळे लहान मूलांवर अनेक दुप्ष्परिणाम होतात. भारत देशात लहान मूलांनी सततच्या मोबाईल वापरामुळे त्याचे अनेक अनिष्ठ परिणाम झाले आहेत. कर्नाटक राज्यातील सरकारने सोशल मीडिया बाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कर्नाटक राज्यात १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाचा वापर नको आहे, असा आदेश मुख्यमंत्री सिद्दरामैय्या यांनी दिला आहे. भारतात सायबर सुरक्षा, भारतातील नागरिकांच्या मानसिकतेवर होणारा सायबर हल्ल्यांचा परिणाम या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतातही ठराविक वयोमर्यादा न ओलांडलेल्या मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कर्नाटकच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच ही घोषणा केली आहे. कर्नाटक राज्यात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मोठ्या आयटी कंपन्या आहेत. त्यामूळे राज्यात १६ वर्षांखालील लहान मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्दरामैय्या यांनी ही घोषणा केली आहे. देशभरातील लहान लहान मुलांचे मानसिक आरोग्य, त्यांची शिकण्याची क्षमता आणि डिजिटल वर्तुळाचे लागणारे व्यसन पाहता हे निर्बंध कर्नाटक राज्यात गरजेचे आहे, असे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्दरामैय्या यांनी म्हटले आहे.
कर्नाटक राज्य शासनाच्या भूमिकेनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अनियंत्रित स्क्रीनटाईममुळे लहान मुलांची वर्तणूक, त्यांची एकाग्रता आणि संरक्षण या सर्वच गोष्टींवर गंभीर परिणाम होतात. ज्यामुळे लहान मुलांना दुष्परिणामांपासुन दूर ठेवण्यासाठी हा कर्नाटक राज्यसरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत देशात फक्त कर्नाटकच नव्हे, तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही आंधप्रदेश राज्यात १६ वर्षांखालील लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पूर्णतः बंदी लागू केली आहे.
भारत देशात लहान मूलांना लहापपणापासून मूलांना मोबाईल पासून दुर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक राज्यात सोशल मीडिया वापरासाठी मुख्यमंत्र्यानी ठाम भूमिका घेतली आहे. राज्यातील लहान मुलांच्या सततच्या मोबाईल वापरामुळे त्याचे अनेक परिणाम होत आहेत. कर्नाटकात सोशल मीडिया बंदी लागू करण्यात आली आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामैय्या यांनी सांगितले आहे. कर्नाटक राज्यातील १६ वर्षाखालील लहान अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मोबाइल स्क्रीन टाईम आणि सोशल मीडियामुळे मुलांवर पडणाऱ्या नकारात्मक परिणामांवर आळा घालण्यासाठी ही सोशल मीडिया बंदी कर्नाटकात लागू करण्यात आली आहे, असे कर्नाटक राज्यसरकारने म्हटले आहे.




