गणित चुकले म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, जिल्हा परिषद शाळेतील घटना; पालकांनी जाईल हेल्पलाइन कडे तक्रार करतात शिक्षकावर गुन्हा दाखल

SHARE:

नागपूर – विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी ही शिक्षकाची असते. मात्र, चिमुकल्यांच्या भावनांचा विचार करून आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना ज्ञानाचे धडे देणे महत्त्वाचे असते. मात्र शिक्षक क्रुरतेची सीमा ओलांडत आहेत. आता अशीच एक धक्कादायक घटना नागपूर जिल्हयाती कुही तालुक्यातील देवळी कला या गावात समोर आली येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला गणित चुकले म्हणून शिक्षकाने बेदम मारहाण केली. यात तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणात शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात देवळी कला या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचवीच्या वर्गात शिकते. नेहमीप्रमाणे ती १० मार्च रोजी शाळेत गेली. शाळेत गणिताच्या तासादरम्यान गणिताच्या शिक्षकांनी तिला प्रश्न विचारला. यावर विद्यार्थिनीने उत्तर दिले, मात्र तिचे उत्तर चुकले. उत्तर चुकले म्हणून संतापलेल्या शिक्षकाने मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. इतकचं नाही तर, मारहाणी नंतर शिक्षकाने विद्यार्थिनीच्या पालकांना बोलावून ही बाब कोणाला सांगितल्यास मुलीला शाळेतून काढण्याची धमकी देखील दिली.

संतापलेल्या पालकांनी घटनेची माहिती चाइल्ड हेल्पलाइनला दिली. घटनेची माहिती मिळतात चाइल्ड हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीच्या घरी जाऊन चौकशी करून खात्री केली. चाईल्ड हेल्पलाइनच्या हस्तक्षेपानंतर शिक्षक मनोहर वाडीभस्मे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर्षीच्या जानेवारी महिन्यात अशीच एक घटना बुलढाणा जिल्हयातील खामगांव तालुक्यातील पिंपळगांव राजा येथून समोर आली. येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला गणित चुकलं म्हणून वर्ग शिक्षकाने अमानुष मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी अमानुष होती की विद्यार्थिनीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

राज्य शासनाने गेल्या वर्षी १३ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी जबाबदारी निश्चित केली आहे. मात्र याचाही परिणाम शाळेतील शिक्षकांवर होताना दिसून येत नाही.

Leave a Comment

अधिक वाचा