जगभरात एआय तंत्रज्ञानातील वाढत्या स्पर्धेमुळे मेटा कंपनी २० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार; १५ हजाराहून अधिक कर्मचारी कपात होण्याची शक्यता

SHARE:

नवी दिल्ली – जगभरात एआय तंत्रज्ञानातील वाढत्या स्पर्धेमुळे मेटा कंपनी २० टक्के कर्मचार्यांना कामावरून कमी करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे, कारण जगभरात एआय तंत्रज्ञानातील वाढत्या स्पर्धेमुळे कर्मचारी संरचनेत बदल होत आहे. मेटा प्लॅटफॉर्म ही फेसबुक आणि इंस्टाग्राम या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार आहे.

त्यामूळे ही कंपनी पुन्हा एकदा कामगार कपातीवर निर्णय घेणार आहे. मेटा कंपनी आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कंपनीमध्ये जवळपास ७९ हजार कर्मचारी काम करत होते. या आकड्यानुसार जर २० टक्के कर्मचारी कपात करण्यात आली, तर १५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची वेळ येणार आहे.

एआय गुंतवणुकीमुळे जगभरातील सर्व आयटी क्षेत्रातील कंपन्यांचा खर्च वाढला आहे. मेटाने अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली आहे. अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी डेटा सेंटर्स, संगणकीय क्षमता आणि संशोधनावर मेटा कंपनीकडून अब्जावधी डॉलर खर्च केले जात आहेत. वाढत्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी कर्मचारी कपातीचा पर्याय विचारात घेतला जात असल्याचे कंपनी प्रशासनाने म्हटले आहे.

मेटा कंपनीने आतापर्यंत एआय प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. एआय क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी मेटाने आपल्या सुपरइंटेलिजन्स लॅब्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या लॅबमध्ये जागतिक स्तरावरील संशोधक आणि अभियंत्यांना सहभागी करून घेतले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने अलेक्झांडर वांग यांच्या एआय स्टार्टअपमध्ये १४.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच २०२८ पर्यंत एआय इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी ६०० अब्ज डॉलर खर्च करण्याचे लक्ष्यही कंपनीने ठेवले आहे.

मेटा कंपनीने यापूर्वीही मोठी कर्मचारी कपात केली होती. जर मेटाने २० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, तर ही सर्वात मोठी कर्मचारी कपात ठरणार आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनीने सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये आणखी १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. जगभरात आयटी तंत्रज्ञान क्षेत्रात बदल होत आहेत. मेटासह इतर आयटी तंत्रज्ञान कंपन्याही एआयवरील वाढत्या खर्चामुळे कर्मचारी संरचनेत बदल करत आहेत.

यावर्षी जानेवारीमध्ये ॲमेझॉन कंपनीने १६ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. तसेच ॲटलासियन या कंपनीने एआयमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी १६०० कर्मचाऱ्यांची कपात केलेली आहे. याशिवाय यांसारख्या जगभरातील अनेक आयटी कंपन्याही एआयमुळे बदलणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्राशी जुळवून घेण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची अदलाबदली करत आहेत, काही ठिकाणी जगभरातील अनेक आयटी कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत.

एआय तंत्रज्ञानातील वाढत्या स्पर्धेमुळे जगभरातील मोठ्या आयटी तंत्रज्ञान क्षेत्रातील हायटेक कंपन्या आपली कार्यपद्धती आणि कर्मचारी संरचना बदलत आहेत. त्यामुळे आगामी काळात आयटी तंत्रज्ञान क्षेत्रात अशा प्रकारचे मोठे निर्णय अधिक प्रमाणात पाहायला मिळण्याची शक्यता जगभरातील आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामूळे आता मेटा कंपनी ही एआयच्या वाढत्या तंत्रज्ञानामूळे कामगार कपात करू शकते, असे आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा