पुणे – गांजाची विक्री करणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. तर या प्रकरणात पुणे पोलिसांकडून २ जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात गांजाची तस्करी करताना एका टोळीला पकडण्यात आले आहे. पुणे पोलिसांकडून २ भावांना अटक केले आहे. या कडक कारवाईत १६ किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुण्यातील बाणेर परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या एका टोळीवर पुणे पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यातील गांजा विक्री प्रकरणात बाणेर पोलिसांनी अभिषेक भिका बोरसे आणि अक्षय भिका बोरसे या २ जणांना अटक केले आहे. व १६ किलो गांजा जप्त केला आहे. याबाबत पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, बाणेर परिसरात २ तरुण दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी महानगरपालिकेच्या जलतरण तलावाजवळ संशयित आरोपींना अडवून चौकशी केली असता, त्यांच्या जवळ असलेल्या पिशवीत हळदीची पाकिटे आढळून आली आहेत.
या पाकिटांची तपासणी केल्यानंतर पोलिस ही चक्रावून गेले आहेत. कारण हळदीच्या नावाखाली या पाकिटांमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता. सुरुवातीला पुणे पोलिसांनी ३ किलो गांजा जप्त केला आहे. आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील त्यांच्या घरात आणखी गांजाचा साठा लपवुन ठेवल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी बाणेर या ठिकाणी धाड टाकली आहे. या कारवाईत १३ किलो गांजा जप्त केला आहे. अशा प्रकारे पुणे शहरातील बाणेरमधून आरोपींकडून एकूण १६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
पुण्यातील गांजा तस्करी प्रकरणातील दोन्ही आरोपी हे खासगी कंपनीत नोकरीला आहेत. दोन्ही आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी हळदीच्या पाकिटांचा वापर करून गांजाची विक्री करत असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात अधिक तपास बाणेर पोलीस करत आहेत.





