मुंबई – रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे.नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. तर महिलेच्या पतीकडून १० लाख रुपये घेऊन फसवणुक केली आहे. मुंबईत डोंबिवलीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रहिम पदमसी करीम जैन आणि करण जोशी अशा ३ नावांचा वापर करणार्या या आरोपीने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केला आहे.
तसेच तिच्या पतीलाही रेल्वेचे कंत्राट देतो असे सांगून त्याच्याकडून १० लाख रुपये घेतले आहेत. व्याजावरील पैसै वसूल करण्याच्या बदल्यात महिलांकडे शरीर सुखाची मागणीही केल्याचा धक्कादायक प्रकार या आरोपीने केल्याचे उघडकीस आले आहे. डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा जामीन अर्ज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणात तो फरार असल्याची माहिती फिर्यादीच्या वकिलांनी दिली आहे.
माहितीनुसार, आरोपीने महिलेला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिला घरी बोलावले होते. त्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. तसेच तिचा अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढून तिला दाखवले आहेत. हा प्रकार कोणाला सांगितला तर, अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली होती. पीडित महिलेला सतत धमकी देऊन आरोपी काही वर्षे तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता.
पीडित महिलेच्या पतीच्या लक्षात आले होते की, आरोपीने १० लाख रूपये घेतले आहे, व त्याची फसवणूक झाली आहे. पत्नीमुळे पती त्याच्या संपर्कात आला होता. पतीने पत्नीला फसवणूक झाल्याचे सांगितले. त्यानंतर पत्नीनेही पतीला तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. त्यानंतर पती पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरापेच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या आधारे डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी रहीम पदमसी व करीम मोहंमद जैन उर्फ करम जोशी याच्या विरोधात ८ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. आरोपीने कल्याण न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती फिर्यादीचे वकिल महेश शिवदास यांनी दिली आहे. आरोपी सध्या पळुन गेला आहे. फरार आरोपी हा व्याजावर पैसै देतो. डोंबिवलीतील अनेक महिलांना त्याने व्याजाने पैसे दिले आहेत. व्याजाने दिललेल्या पैशाच्या वसुलीसाठी तो संबंधित महिलांकडे शरीर सुखाची मागणी करतो, असा आरोप संबंधित महिलांकडून करण्यात आला आहे.
त्या महिलांनी आरोपी विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणात आता डोंबिवलीतील काही महिलांकडून आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे. या प्रकरणात अधिक तपास डोंबिवली पोलिस करत आहेत.





