मुंबई – रुपाली चाकणकर व सुनील तटकरे भोंदू अशोक खरातच्या संपर्कात होते व त्यांना भेटायला जायचे, असा शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी अजितपवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. आमदार माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी भोदू अशोक खरातकडे सुनिल तटकरे जात होते. शरद पवार गटाच्या नेत्यानी हा खळबळजनक आरोप केला आहे.
भोंदू अशोक खरात याचे राज्यातील अनेक सत्ताधारी राजकीय नेत्यांशी संबंध होते. तो भोंदू अशोक खरात अधिकार्यांच्या बदल्याही करण्यात महत्त्वाची भूमिका बजावायचा असा त्याच्यावर आरोप आहे. सध्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्यातील अनेक सत्ताधारी राजकीय नेते हे अडचणीत आलेले दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांना भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे सर्वात मोठा झटका बसला आहे. त्यांना राज्यातील महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी गंभीर आरोप केला आहे. भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे शोषण केले आहे. त्यामुळे याला तर शिक्षा झालीच पाहिजे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा पदाचा देखील राजीनामा दिला आहे. पण त्यांनी फक्त राजीनामा देऊन काही होणार नाही.
त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण गरजेचे आहे. त्याचबरोबर सुनील तटकरे यांनादेखील सहआरोपी करणे गरजेचे आहे. कारण रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे या भोंदू अशोक खरातच्या नेहमी संपर्कात होते आणि त्याला भेटायला जायचे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे या दोघांना सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हा भोंदू अशोक खरात बाबा होता.
पण त्याला स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे हे विरोध करायचे. या भोंदू बाबासोबत त्यांचा एकही फोटो आणि व्हिडिओ समोर आलेला नाही. पण आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून या भोंदू अशोक खरात याने सुनील तटकरे यांना आग्रह धरला होता, तो भोंदू अशोक खरात त्यासाठी सुनिल तटकरेंना फोन करायचा की नाही? याचा खुलासा सुनील तटकरे यांनी केला पाहिजे. आणि माणिकराव कोकाटे यांनीही याबाबत बोलले पाहिजे, असे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले आहेत.





