निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकाम केल्याचा ठाकरे शिवसेनेचा आरोप; कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी

SHARE:

भंडाऱा – जिल्ह्यात निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकाम केल्याचा ठाकरे शिवसेनेकडून आरोप करण्यात आला आहे, तर कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी ही ठाकरेगट शिवेसनेकडून करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात ३४ कोटींचा रस्ता केला आहे, परंतु कंत्राटदाराने सिमेंट वापरले नाही तर कोळशाची राख आणि निकृष्ट गिट्टीचा वापर केल्याचा गंभीर आरोप ठाकरेगट शिवसेनेकडून करण्यात आला आहे. राज्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सुरू असलेल्या ३४ कोटींच्या रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी कोळशाची राख आणि निकृष्ट गिट्टीचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राज्यात विकासकामांच्या नावाखाली अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी जनतेच्या महसूल करातून जमा झालेल्या पैशांची कंत्राटदार आणि प्रशासन मिळून कसा गैरवापर करतात, याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून ही घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ३४ कोटींच्या रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी कोळशाची राख आणि निकृष्ट गिट्टीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ३  महत्त्वाच्या रस्त्यांची कामे चालू आहेत.

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कराडला ते ढोलसर, मांडळ ते बोथली, मांडळ ते सरांडी या 3 रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ३३४  कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, हे रस्ते बांधकाम काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. हे रस्ते बांधकाम कंत्राटदार केवळ स्वतःचा खिसा भरण्यात मग्न आहे. असा दावा स्थानिक नागरिकांसह परिसरातील राजकीय नेत्यांनी केला आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे लाखांदूर तालुकाप्रमुख विनोद ढोरे यांनी कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या प्रशासनाविरुद्ध तक्रार केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे लाखांदूर तालुकाप्रमुख विनोद ढोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी कोळशाच्या राखेचा वापर होत असल्याचे दिसले आहे, आणि दर्जेदार गिट्टीऐवजी वाळू मिश्रित चुरा वापरला जात असल्याचे दिसले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे लाखांदूर तालुकाप्रमुख विनोद ढोरे यांनी या कामाचा रीतसर पंचनामा करत या रस्ते बांधकामातील कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या गंभीर आरोपांनंतर बोलताना प्रशासनाचे उपविभागीय अभियंता विजया सावरकर यांनी म्हटले आहे की, रस्ता बांधकामाच्या कामात कुठलीही चुक नसून अंदाजपत्रकानुसारच काम योग्य पद्धतीने चालू आहे.

लाखांदूर तालुक्यातील रस्ता बांधकामासाठी जो डब्ल्यूएमएम थर गरजेचा आहे त्यानुसार काम ग्रेडेशन नुसार सुरू आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ता बांधकाम असल्याने राज्य गुणवत्ता निरीक्षक हे राज्यातील कुठूनही येतात, रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता तपासतात आणि हे तपासणी करत असताना अंदाजपत्रकानुसार लेयरनुसार तपासणी करत असल्याने त्यात कुठलाही घोटाळा होऊ नये, या दृष्टीने आम्ही त्यावर नियंत्रण ठेवून आहोत. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राख होती. मात्र, ती कंत्राटदाराने स्वतःच्या कुठल्यातरी कामासाठी आणली असावी, असे उत्तर उपविभागीय अभियंता विजया सावरकर यांनी दिले आहे. ३४ कोटींच्या या घोटाळा झालेल्या कामावर व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या त्या कंत्राटदारावर शासन काय कारवाई होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात आता भंडारा जिल्ह्यातील प्रशासनाच्या भुमिकेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा