जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला; दुचाकीवर आलेल्या टोळक्याने गाडी थांबवून दगडफेक केली

SHARE:

जळगाव – शहरामध्ये जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा जनक्रांती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. दुचाकीवर आलेल्या टोळक्याने मुकुंद सपकाळे यांचीगाडी अडवली आणि गाडीवर दगडफेक केली आहे. या घटनेने जळगावात खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील रिंग रोड परिसरात जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला करण्यात केल्याची घटना समोर आली आहे. जळगाव शहरातील गजबजलेल्या रिंग रोड परिसरात जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने मुंकुंद सपकाळे यांची कार अडवून चारही बाजूंनी जोरदार दगडफेक केली आहे. या भीषण हल्ल्यात मुकुंद सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे जळागाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मुकुंद सपकाळे हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह कारने रिंग रोड परिसरातून जात होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या काही तरुणांनी त्यांची गाडी अडवली आणि काही कळण्याच्या आतच वाहनावर दगडांचा वर्षाव सुरू केला. हल्लेखोरांनी इतक्या जोराने दगडफेक केली की कारच्या काचा फुटून मुकुंद सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे.

हल्ल्यानंतर मुकुंद सपकाळे यांनी स्वतः जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गेले आहेत. जळगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला एका जुन्या वादातून झाला असल्याचे समोर येत आहे. मुकुंद सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल अहिरे नावाच्या तरुणासोबत त्यांचा वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून विशाल अहिरेने आपल्या साथीदारांसह हा हल्ला केल्याचा आरोप मुकुंद सपकाळे यांनी केला आहे. जळगाव मध्ये भरदिवसा शहराच्या मुख्य भागात हा हल्ला झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जळगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मुख्य संशयित आरोपी विशाल अहिरे आणि त्याच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. जळगावात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. जळगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जळगावातील राजकीय पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्यामुळे जळगाव पोलीस प्रशासनाने आरोपींना अटक करण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अधिक तपास जळगाव पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा